Pune | पुणे : हडपसर ही एक महापालिका करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून तसेच राजकीय क्षेत्रातूनही करण्यात येत होती. पूर्व हडपसर-वाघोली ही स्वतंत्र महापालिका घोषित करण्याबाबत राज्य शासनेने पावले उचलली आहे. त्यासाठी सरकारनेच पुणे महापालिकेकडून अभिप्राय मागविला आहे. अशी माहिती समोर आली आहे.
स्वतंत्र महापालिकेची मागणी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. या मागणीनुसार आता स्वतंत्र महापालिकेच्या हालचालींना पुन्हा सुरुवात झाली असल्याचे समोर आले आहे.
महापालिकेत 34 गावांंच्या समावेशानंतर स्वतंत्र महापालिकेच्या मागणीने धरला जोर…
महापालिकेत 34 गावांंच्या समावेशानंतर स्वतंत्र महापालिकेच्या मागणीने जोर धरला आहे. पालिकेत येऊनही समाविष्ट गावांना पायाभूत सोयी-सुविधा मिळत नसल्याची नागरिक त्रासले आहेत.
आता उरुळी देवाची आणि फुरसुंगी या गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्याची मागणी केली होती, त्यानुसार राज्य सरकारने या दोन गावांचा महापालिकेतून वगळण्यात आले आहे. स्वतंत्र नगरपरिषद स्थापन करण्याची अधिसूचना गतआठवड्यात नगरविकास खात्याने काढली.
दरम्यान, उरुळी-फुरसुंगीनंतर वाघोली गावानेही स्वतंत्र नगरपरिषद अथवा हडपसर-वाघोली महापालिका घोषित करण्याची मागणी केली होती. त्याअनुषंगाने पालकमंत्री पाटील यांनी या गावासाठी स्वतंत्र नगरपालिका किंवा पूर्व हडपसर-वाघोली महापालिका घोषित करावी अथवा सोयी सुविधांचा विकास आराखडा तयार करून निधी द्यावा, अशी मागणी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली होती.
मुख्यमंत्र्यांनी या पत्राची तत्काळ दखल घेतली आहे. यासंदर्भात आता नगरविकास विभागाने स्वतंत्र नगरपालिका आणि पूर्व हडपसर वाघोलीबाबत महापालिकेला तत्काळ अभिप्राय सादर करण्याचे आदेश नुकतेच दिले आहेत. त्यामुळे आता स्वतंत्र महापालिकेच्या हालचालींना पुन्हा वेग आल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, येत्या आठवड्यात यासंबंधीचा अभिप्राय शासनाला पाठविला जाईल, असे महापालिकेच्या वरिष्ठ अधिकार्यांकडून सांगण्यात आले.
पुणे आणि खडकी कॅन्टोमेन्टचे विलिनीकरणही महापालिकेत??…
34 गावांच्या समावेशानंतर पुणे ही क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यातील सर्वांत मोठी महापालिका बनली आहे. त्यात आता पुणे आणि खडकी कॅन्टोमेन्टचे विलिनीकरणही महापालिकेत करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे महापालिकेचा पसारा आणखी वाढणार आहे. आता महापालिकांच्या निवडणुका झालेल्या नाहीत.
त्यामुळे स्वतंत्र महापालिका घोषित करण्यासाठी ही योग्य वेळ असल्याची चर्चा आहे.काँग्रेस-राष्ट्रवादीही आग्रही नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रवादीचे हडपसरचे आमदार चेतन तुपे यांनी पूर्व हडपसर महापालिका स्थापन करावी, अशी मागणी केली होती. तर या भागातील काँग्रेसचे नेतेही स्वतंत्र महापालिकेसाठी आग्रही आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Bhigvan News : भिगवण रोटरी क्लबचा स्तुत्य उपक्रम : वन्य प्राण्यांसाठी तयार केले पानवठे ..!