Ambegaon News | पुणे : आंबेगाव परिसरात बिबट्याटी दहशत कायम असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बिबट्या कधी कोणत्या वेळेला येईल अन् हल्ला करेल हे सांगता येत नाही. घराबाहेर बांधलेली जनावरे देखील सुरक्षित नाहीत.
बिबट्याने चांडोली बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील वेताळ मळ्यातील शेतकरी कैलास लक्ष्मण थोरात यांच्या घरालगतच्या गोठ्यामध्ये प्रवेश करून बिबट्याने 3 शेळ्यांचा फडशा पाडला.
वेताळमळा वस्तीवर दहशतीचे वातावरण…
बिबट्याच्या हल्ल्याबाबत माहिती कळताच वनरक्षक प्रदीप औटी, वनमजूर जालिंदर थोरात यांनी घटनास्थळी भेट दिली. बिबट्याच्या हल्ल्यामुळे वेताळमळा वस्तीवर दहशतीचे वातावरण पसरले आहे. ही घटना शनिवारी (दि. 1) पहाटे घडल्याची माहिती माजी उपसरपंच संदीप थोरात यांनी दिली.
वन विभागाने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य गोविंद थोरात यांनी केली. बिबट्याने 3 शेळ्या ठार मारल्याने कैलास थोरात यांचे मोठे नुकसान झाले. त्यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
शेतकर्यांनी यापुढील काळात बंदिस्त गोठा करताना दरवाजाच्या वरील बाजूस जाळी टाकावी. तसेच, जाळीच्या खालील बाजूस मजबुतीकरण करावे. यामुळे बिबट्याला गोठ्यात प्रवेश करता येणार नाही, असे संदीप थोरात यांनी सांगितले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Ambegaon News : बिबट्याच्या हल्ल्यांचे सत्र थांबेना ! दबा धरुन बसलेल्या बिबट्याने महिलेवर केला हल्ला
Junnar News | पुणे : तरुणावर बिबट्याने अचानक केला हल्ला आणि मग
Warje News | वारजे परिसरातील न्यू अहिरे सोसायटीतील बिबट्या अखेर दोन तासांनी जेरबंद