Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Police Recruitment | लोणी काळभोर येथील पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेच्या केंद्रावर विद्यार्थी व पालकांचे प्रचंड हाल ; प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना नाही…!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 2 April 2023, 12:59

विशाल कदम 

Pune Police Recruitment | लोणी काळभोर : पोलीस बनायच स्वप्न उराशी बाळगून ७ हजारहून अधिक उमेदवार पोलीस भरतीची लेखी परीक्षा देण्यासाठी लोणी काळभोर (ता. हवेली) येथे परीक्षेच्या आदल्या दिवशी म्हणजे शनिवारी (ता.१) दाखल झाले. परंतु, या विद्यार्थ्यांची व त्यांच्यासोबत आलेल्या पालकांची प्रशासनाने कोणत्याही प्रकारची सोय केली नव्हती. त्यामुळे या सोयी सुविधांच्या अभावी विद्यार्थी व पालकांचे प्रचंड हाल झाले आहेत.

महाराष्ट्र पोलीस शिपाई पदाची पद भरती सुरु आहे. पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस भरती २०२१ च्या ५७६ पोलीस शिपायांच्या जागांच्या भरतीची आज रविवारी (ता.२) लेखी परीक्षा होती. सकाळी १० ते ११.३० यावेळेत लेखी परीक्षा होणार होती. या लेखी परीक्षेसाठी लोणी काळभोर येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ येथील परीक्षा केंद्र नेमण्यात आले होते.

 

केंद्रावर सुमारे ७ हजारहून अधिक उमेदवार …

परीक्षेला कोणत्याही परिस्थितीत उशीर होऊ नये म्हणूव विद्यार्थी परीक्षा केंद्रावर आदल्या दिवशी म्हणजेच शनिवारी (ता.१) दाखल झाले. या केंद्रावर सुमारे ७ हजारहून मुले व मुली त्यांच्या पालकांसह आले होते.या परीक्षा केंद्रावर विद्यार्थी व पालक आदल्या दिवशी येतील अशी माहिती असताना देखील प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची सोय केली नव्हती. तर सुरक्षेचे कारण देत विद्यापीठ प्रशासनाने उमेदवारांना गेटबाहेरच अडवले. त्यामुळे कुठल्याही प्रकारची सोय न केल्याने विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या गेट समोर, फुटपाथवर, रेल्वे पुलाखाली रात्र काढावी लागली.

दरम्यान, हवेली पंचायत समितीचे माजी सभापती अनिल टिळेकर यांनी कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील मधुबन कार्यालयात २०० ते २५० मुलींची राहण्याची सोय केली. लोणी काळभोर ग्रामपंचायतीची दोन कार्यालये मोकळी करुन ५०० मुलांची राहण्याची सोय केली. तर कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीने पालखीस्थळ येथे अडीचशे हून अधिक विद्यार्थ्यांची राहण्याची सोय केली. अशा प्रकारे पोलीस भरतीची लेखी परीक्षा देण्यासाठी आलेल्या १००० हून अधिक विद्यार्थ्यांची सोय करण्यात आली.

पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस दलातील ५७६ रिक्त पोलीस शिपायी पद भरती प्रक्रिया सुरु आहे. शारिरीक चाचणी नंतर आता लेखी परीक्षा घेण्यात आली.रविवारी लेखी परीक्षा घेण्यात आली असून राज्यातून लोणी काळभोर येथील परीक्षा केंद्रावर ६८०० विद्यार्थ्यांनी अर्ज केले. यामध्ये २ हजार ५०० विद्यार्थिनी तर ४३०० विद्यार्थ्यांचा समावेश होता.

विद्यार्थ्यांची मोठी संख्या असल्याने पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस दलातील २५० अधिकारी आणि ७५० कर्मचारी तर लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील ५० पोलीस कर्मचाऱ्यांनी परीक्षा केंद्रावर चोख बंदोबस्त ठेवला होता.

लोणी काळभोर येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या परीक्षा केंद्रावर उमेदवारांना सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास प्रवेश देण्यात आला. परीक्षेचा लेखी पेपर १०० गुणांचा होता. विद्यार्थ्यांनी सकाळी दहा ते साडेअकरा या कालावधीत परीक्षा दिली.

पेपर संपल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सेवा विभागाच्या माध्यमातून उमेदवारांना दुपारच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. तर या परीक्षा केंद्रावर कोल्हापूर विभागाचे विशेष महानिरीक्षक सुनील फुलावे यांनी भेट दिली आहे.

 

पुणे सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी…

लोणी काळभोर येथील पोलीस भरती परीक्षा केंद्रावर उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. परीक्षेचा पेपर सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास संपल्यानंतर उमेदवार आपापल्या परीने घरी लवकर जाण्यासाठी प्रयत्न करीत होते. त्यामुळे पुणे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. विद्यार्थ्यांनी भरलेल्या बस पुण्याकडे आणि सोलापूरच्या दिशेकडे चाललेल्या होत्या. विद्यार्थ्यांना बसमध्ये बसण्यासाठी जागा नसल्यामुळे विद्यार्थी एका पायावर तसेच  बसच्या दरवाज्यावर लटकत होते. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र हि गर्दी दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास कमी झाली. यावेळी लोणी काळभोर पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!

Pune News | पिरंगुटच्या संस्कार इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये;ग्रॅज्युएशन डे ; उत्साहात साजरा

Loni Kalbhor Crime : लोणी काळभोर, उरुळी कांचनसह परिसरात गुटखा विक्री जोमात ; पोलीस प्रशासनाचे हाताची घडी अन् तोंडावर बोट..!

Loni Kalbhor | लोणी काळभोर येथील हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीतर्फे पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूलला सहा लाख रुपयांचे जलशुद्धीकरण केंद्र भेट..!

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

5.5 वर्षे पगारच दिला नाही! पुण्यातील प्रसिद्ध सिंहगड इन्स्टिट्यूट वादात; शिक्षकांचे वेतन थकवल्याप्रकरणी संस्थापकासह 7 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 10:55

शेतातील ट्रान्सफॉर्मर फोडून 40 किलो तांब्याच्या कॉइलची चोरी; शिरूरमध्ये खळबळ

Saturday, 4 July 2026, 10:33

‘शेतात सोन्याचा हंडा सापडला’ म्हणत विकली 1,000 नाणी; 5 लाख दिल्यानंतर पिशवी उघडताच वाहनचालकाला बसला धक्का

Saturday, 4 July 2026, 10:25

न्हावरेतील ‘तो’ लाडावलेला डॉक्टर कोण? गर्भलिंग निदान रॅकेटच्या तपासात नव्या चर्चांना उधाण…..

Saturday, 4 July 2026, 9:48

मान्सूनचा रौद्रावतार! बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचा कहर वाढणार

Saturday, 4 July 2026, 9:44

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा हाय-प्रेशर पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40
Next Post

Ambegaon News | बिबट्याची दहशत... 3 शेळ्यांचा पाडला फडशा ...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.