Pune Crime | पुणे : शहरात कोयता गॅंगने धुमाकुळ घातला आहे. पोलिसांनी कडक कारवाई करुनही कोयता गॅंगची दहशत सुरुच आहे. अशातच कात्रज भागात कोयता गँगने दहशत माजवून एका तरुणावर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तीन मुलांचे वय १५ वर्षे…
विशाल विठ्ठल धुळे (वय १८, रा. जय शंकर अपार्टमेंट, कात्रज) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. त्याने याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसारतीन अल्पवयीन मुलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तीन मुलांचे वय १५ वर्षे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलांचा विशाल याच्याशी वाद झाला होता. तो कात्रज भागातील किनारा हाॅटेल परिसरातून निघाला होता. त्या वेळी तिघांनी त्याला अडवून त्याच्यावर कोयत्याने वार केले.विशाल गंभीर जखमी झाला. पसार झालेल्या अल्पवयीन मुलांचा शोध घेण्यात येत असून पोलीस उपनिरीक्षक अतुल थोरात तपास करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Pune Crime : जून्या वादातून कोयता गँगचा तरुणावर वार
वाकड येथे कोयता गॅंगची दहशत; फिनिक्स मॉलमध्ये घुसून माथाडी कामगारांना मारहाण