अहमदनगर : Ahmednagar Crime टोळक्याने दोघांवर कोयत्याने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी सराईत गुन्हेगारास अटक करण्यात पोलीसांना यश आले आहे. (Ahmednagar Crime) मोटारसायकल जवळ काय करत होता अशी विचारणा केली असता राग आला त्यातून टोळक्याकडून हे कृत करण्यात आले होते. यामध्ये दोन जण जखमी झाले होते. ही घटना नगर मधील माळीवाडा येथे घडली होती. (Ahmednagar Crime)
तीन जणांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
याप्रकरणी अभिजित मिलींद भिंगारदिवे (वय-२४ वर्षे धंदा-केक शॉप, रा. जिल्हा परिषदेच्या समोर माळीवाडा) यांनी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. त्यावरून म्हम्या उर्फ संदिप शरद शिंदे, दिपक शरद शिंदे व सोनु उर्फ सोन्या शरद शिंदे यांच्याविराधोत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांच्या मित्राने तु मोटारसायकल जवळ काय करत होता अशी विचारणा केली. याचा राग आरोपीस आला त्यातून आरोपी दिपक याने फिर्यादी यांच्या पायावर कोयत्याने मारहाण करून गंभीर जखमी केले तसेच आरोपी म्हम्या याने कोयत्याने घटनास्थळी असणारे साक्षीदार अभिषेक बोडखे यास जिवे ठार मारण्याचे उददेशाने डोक्यावर मारुन गंभीर जखमी केले. तसेच फिर्यादी व साक्षिदार यांना या टोळक्याने मिळून लाकडी दांडके, सिमेंट ब्लॉक, वीट व लाथाबुक्यांनी मारहाण करुन शिवीगाळ, दमदाटी केली.
दरम्यान, या घटनेनंतर आरोपी फरार होते. त्याचा शोध घेत असतांना कोतवाली पोलीसांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, आरोपी शरद शिंदे हा त्याचे राहते घरी घरातील सदस्यांना भेटण्याकरिता येणार आहे. अशी गुप्त माहिती मिळाली त्यानंतर गुन्हे शाखेच्या शोध पथकाने सापळा लावून आरोपी शरद यास शिताफीने ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली दरम्यान पोलीसांनी सखोल चौकशी करता त्याने व त्याच्या साथीदारांनी मिळुन सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. पुढील तपास पोलीस करत आहेत.