पुणे : Girish Bapat News- भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पक्षनिष्ठ व्यक्तिमत्त्व खासदार आदरणीय गिरीशजी बापट (MP Girish Bapat) यांचं निधन अतिशय दुःखद (With the departure of MP Girish Bapat) आहे. त्यांच्या जाण्याने पुणे आज पोरकं झालं (Pune became poor) असल्याची भावना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील (Guardian Minister Chandrakantada Patil) यांनी व्यक्त केली. ,
खासदार गिरीश बापट यांच्या सारख्या ज्येष्ठ आणि अनुभवी व्यक्तिमत्त्वाच्या जाण्याने पक्षाचा आधारवड हरपला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, नगरसेवक, आमदार, खासदार आणि राज्याचे मंत्री अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी उत्तमरित्या पार पाडल्या.
बापट साहेबांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने ‘पुण्याची ताकद गिरीश बापट’ ही ओळख जनमानसात तयार केली होती. आज बापट साहेबांच्या जाण्याने पुणे पोरकं झालं आहे. बापट साहेबांच्या जाण्याने आमचा मार्गदर्शक हरपला आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
भाऊंची मला आलेली ही चिठ्ठी म्हणजे आयुष्याचा ठेवा
1 फेब्रुवारी 2023. भाऊंची मला आलेली ही चिठ्ठी म्हणजे आयुष्याचा ठेवा ! प्रकृती बरी नसताना प्रचारात उतरणारे आणि मतदान करणारे लढवैय्या भाऊ सर्वांनी बघितले. पण मला दीनानाथ मधून अशी चिठ्ठी लिहिणारे भाऊ म्हणजे पक्ष निष्ठेचा दीपस्तंभ.. 40 वर्षांच्या स्नेहात मला जे भाऊ समजले ना ते हे… .माझ्यासाठी पितृतुल्य व्यक्तिमत्व कार्यकर्त्यांचा आधारवड, सर्वांच्या सुख दुःखात सहभागी होणारे, सामान्य नागरिकांच्या ह्रदयात घर करणारे भाऊ, कामाचे नियोजन आणि नियोजनाप्रमाणे काम करणारे भाऊ, टिंगल मस्करी करत हसत खेळत कारभार करणारे भाऊ… टिंगल करताना, चिमटा काढतांना जखम होणार नाही याची काळजी घेणारे भाऊ…. समर्पित स्वयंसेवक, पक्षनिष्ठ, अफाट कष्ट घेणारे, पराभवा नंतर ही वैफल्यग्रस्त न होता नव्या जिद्दीने काम करणारे – नव ऊर्जे ने पुन्हा पराभव पचवून विजय मिळविणारे भाऊ…. नियती पुढे मात्र हरले….
अशा भावना पाटील यांनी गिरीश बापट यांची चिठ्ठी प्रसिध्द करत भावना व्यक्त केली.