राजेंद्रकुमार शेळके
(Pune )पुणे : जिल्हा शिक्षण मंडळाच्या कॉलेज ऑफ फार्मसी हडपसर महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण समारंभ “मीराकी” २०२२-२३ उत्साहात साजरा झाला.
यावेळी प्रमुख पाहुणे मराठी चित्रपटातील जेष्ठ अभिनेते सुनील गोडबोले, सिरम इन्स्टिट्युटचे डायरेक्टर डॉ.आशिष सहाये, पुणे महानगरपालिकेच्या माजी स्वीकृत नगरसेविका संजीवनी जाधव, माजी स्वीकृत नगरसेवक अविनाश काळे, अक्षय शेवाळे, अमित पवार, डॉ.शंतनु जगदाळे, विक्रम जाधव, डॉ. राहुल घुले, परमेश्वर काळे, हरिभाऊ काळे, बाळासाहेब शेवाळे, प्रीतम शेवाळे, प्राचार्य. नितीन सावळे, प्राचार्य सचिन भारद्वाज तसेच डॉ.राकेश लहाने आदी उपस्थित होते.
वार्षिक स्नेहसंमेलनाचे उदघाटन रोटरी क्लबच्या अध्यक्षा आणि उद्योजिका वर्षा संजय कारले यांच्या हस्ते झाले.यावेळी छोटे कलाकार दिग्विजय सचिन शिंदे व ज्ञानेश्वरी रावडे यांनी पोवाडा व भरत नाट्य सादर केले. विद्यार्थ्यांनी डान्स, फँशन शो, संगीत सादर केले.
दरम्यान, गोडबोले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांच्या कला गुणांचा कौतुक केले. प्राचार्य अश्विनी शेवाळे यांनी महाविद्यालयात वर्षभरात घेण्यात आलेल्या विविध शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा स्पर्धा यांचा आढावा सांगितला. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीसे देण्यात आली. प्राचार्य शेवाळे व शिक्षकांनी लिहिलेल्या पदविका फार्मसीचे फील्ड व्हिजिट असायनमेनट बुक, ब्रिलियंट पब्लिकेशन, तसेच ट्रेनिंग अँड प्लेसमेंट मॅन्युअल २०२२-२३ महाविद्यालयाचे न्यूज लेटरचे प्रकाशन करण्यात आले.
सूत्रसंचालन देवयानी किरवे व अश्विनी भोसले यांनी केले. तर आभार माधुरी शिर्के यांनी मानले. संयोजन सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पदविका अभ्यासक्रम व पदवी अभ्यासक्रम फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी केले.