लोणी काळभोर (पुणे) – लोणी काळभोर हद्दीतील एका बड्या शिक्षण संस्थेत नोकरी करणाऱ्या एका पंचवीस वर्षीय युवकाने, आपल्याच ओळखीच्या एका नातेवाईकाच्या पाच वर्षीय मुलीवर मागिल वर्षभराच्या काळात अनेक वेळा लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.
ऋषीकेश दत्ता गिरी (वय-25 वर्षे, रा. लोणी स्टेशन, कदमवाकवस्ती ता.हवेली) हे त्या हैवानाचे नाव असुन, लोणी काळभोर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल होताच जेरबंद केले आहे. या प्रकरणी पिडीत मुलीच्या आईने ऋषीकेश गिरी याच्या विरोधात लोणी काळभोर पोलिसात तक्रार दिली आहे.
लोणी काळभोर पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत मुलीची आई नोकरीस दुसऱ्या जिल्हात असल्याने, पिडीत मुलगी लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका छोट्या गावात पिडीत मुलीच्या आईच्या जवळच्या नातेवाईकाकडे राहते. पिडीत मुलीच्या आईचे नातेवाईक व ऋषीकेश गिरी याची ओळख असल्याने, ऋषीकेश गिरी अधुन मधुन संबधित नातेवाईकाकडे येजा करत होता. पिडीत मुलगी राहत असलेले कुटुंबही दिवसभर कामाला जात असल्याचा फायदा उठवत, ऋषीकेश गिरी याने मागिल वर्षभराच्या काळात पिडीत मुलीवर अनेक वेळा लैंगिक अत्याचार केले. अत्याचारानंतर ऋषीकेश गिरी हा पिडीत मुलीला मारहान करण्याबरोबरच, आईला जिवे मारण्याची धमकी देत असल्याने मुलगी गप्प राहत होती.
दरम्यान पिडीत मुलीच्या आईला कामावरुन कांही दिवसाची सट्टी मिळाल्याने, पिडीत मुलीची आई सुट्टीसाठी मुलीला घेऊन तिच्या मुळगावातील घरी गेली. तीन दिवसापुर्वी आई मुलीला अंघोळ घालत असताना, मुलगी विशीष्ठ वेळी रडत असल्याने आईला मुलीच्या हालचालीबाबत संशय आला. यावर आईने मुलीला रडण्याचे कारण विचारले असता, वरील संतापजनक प्रकार पुढे आला. ऋषीकेश गिरी हा मागिल अनेक दिवसापासुन लैंगिक अत्याचार करत असल्याची माहिती मुलीने देताच, नखशिखांत हदरलेल्या पिडीत मुलीच्या आईने थेट लोणी काळभोर पोलिस ठाण्यात जाऊन घडलेली घटना वरीष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांना सांगितली.
वरीष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी घटनेची गंभीरता लक्षात घेऊन, एकीकडे गुन्हा दाखल करतानाच दुसरीकडे ऋषीकेश गिरी याला ताब्यात घेतले. पोलिसांनी ऋषीकेश गिरी याला अटक करुन न्यायालयात उभे केले असता, न्यायालयाने ऋषीकेश गिरी यास पाच दिवसाची पोलिस कोठडी ठोठावली.