Uruli Kanchan News | उरुळी कांचन, (पुणे) : वीज बिलातील चुकांच्या बाबतीत विक्रमावर विक्रम करीत असलेल्या महावितरण कंपनीचा नवीन प्रताप पुढे आला आहे. उरुळी कांचन परिसरातील एका वायरमनने घरात कोणी राहत नसल्याची संधी साधत सदनिकेतील मीटर काढून परस्पर दुसऱ्याला दिल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे.
याबाबत घरमालक केतन दिलीप शाह (रा. कोरेगाव मूळ, ता. हवेली मूळ रा. पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ऑनलाईन तक्रार दिली आहे. तसेच रास्तापेठ येथील महावितरण मुख्य कार्यालय या ठिकाणी तक्रार दिली आहे. तरीही लोणी काळभोर पोलीस व महावितरणच्या अधिकाऱ्याकडून कोणतीही कारवाई झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.
सदरची सदनिका बंद …
मिळालेल्या माहितीनुसार, केतन दिलीप शाह यांची कोरेगाव मूळ ग्रामपंचायत हद्दीतील गगन आकांक्षा इमारतीत एक सदनिका आहे. सुरुवातीला त्या ठिकाणी शाह राहत होते. मुलाचे शिक्षक झाल्याने सदरची सदनिका बंद होती. मात्र वीजमीटर सुरु होते. त्यामुळे महिन्याला येणारे ११० रुपयांचे वीजबिल ते भरीत होते.
मागील तीन महिन्यांपूर्वी ५ हजार एवढे लाईट बिल आले त्यावेळेस त्यांनी ते भरले. मात्र पुन्हा तीन महिन्यांनी सदरचे लाईटबिल हे ७ हजार रुपये आल्याने सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी वीजमीटर मिळून आला नाही. वीज मीटरचे बिलिंग सायकल मासिक बदलल्याने वीज बिल तीन महिन्यांनी मिळाले. तांत्रिक विश्लेश्नाद्वारे तपास केला असता सदरचा मीटर हा साडे तीन किलोमीटर अंतरावर मिळून आला. याबाबत एका वायरमनला विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच वीजमीटर हा कार्यालयात असल्याची माहिती दिली.
याबाबत केतन शाह यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात व रास्तापेठ येथील महावितरण मुख्य कार्यालय या ठिकाणी तक्रार दिली आहे. मात्र अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे लोणी काळभोर पोलीस काय कारवाई करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
याबाबत शहा व त्यांचे सहकारी उरुळी कांचन कार्यालयातील सहायक अभियंता संजय पोफळे यांच्याकडे तक्रार देण्यासाठी गेले होते. त्यावेळी पोफळे यांनी त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच उरुळी कांचन परिसरात एखाद्या तक्रार सांगितली असता ते काम माझे नाही ते काम वरिष्ठांचे असल्याची बतावणी करून वेळ मारून नेत असल्याच्याही अनेक तक्रारी नागरिकांनीही केल्या आहेत.
याबाबत बोलताना उरुळी कांचन येथील सहायक अभियंता संजय पोफळे म्हणाले, माझ्या अखत्यारीत उरुळी कांचन, शिंदवणे, व वळती हि गावे आहेत. कोरेगाव मूळचा भाग माझ्याकडे नसून दुसऱ्या अधिकाऱ्याकडे आहे. त्यामुळे सदर घटनेची माहिती हि तेथील अधिकारी देतील.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Uruli Kanchan News | पूर्व हवेलीतील हिंगणगावचा शेतकरी पुत्र किरण पोपळघट बनला DYSP