Pune Crime | पुणे : रामटेकडी परिसरात गप्पा मारत बसलेल्या तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला केला. त्याचे वडिल भांडण सोडविण्यास आले असता त्यांच्यावर या टोळक्याने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. हल्याचे कारण अस्पष्ट असून, यात वडिलासंह तरुण गंभीर जखमी झाला आहे.
वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार…
याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात सुदेश पुरमसिंग थापा (वय ४९) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून तीन तरुणांवर गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास हा प्रकार घडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदारांचा मुलगा राम व त्याचे मित्र विठ्ठल रूक्मीनी मंदिरासमोर गप्पा मारत बसले होते. त्यावेळी तिघांचे टोळके आले. त्यांनी पाच मिनिटात घरी जावा. नाही तर तुमचे हात पाय तोडू अशी धमकी दिली.
तसेच, त्यांना शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. तर एकाने लोखंडी रॉडने राम याच्यावर हल्ला केला. त्याचवेळी रामचे वडिल सुदेश हे भांडण सोडविण्यास आले असता त्यांच्यावर देखील रॉडने हल्ला करण्यात आला. यात डोक्याला मार लागल्याने दोघेही जखमी झाले. पुढील तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!