लहू चव्हाण
Pachgani News | पाचगणी : महाबळेश्वर तालुक्यातील अवैध बांधकाम तोडण्याचे आदेश जिल्हाधिकारी जयवंश सुर्यवंशी यांनी दिले आहेत. त्यासंदर्भात मंगळवारी आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली तालुक्याचे शिष्टमंडळ स्थानिक भूमीपुत्रांच्या बांधकामाबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार असल्याचे जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपुरे यांनी सांगितले.
राजपुरे म्हणाले, ”महाबळेश्वर तालुक्याचा रिजनल प्लॅन २००२ साली अस्तित्वात आला त्याची मुदत २०२२ पर्यंत होती. आमचा रिजनल प्लॅन शासनाकडे कित्येक वर्षापासून अंतिम मंजुरीसाठी प्रलंबित आहे.”
स्वातंत्र्यपूर्व काळापासून अनेक गावांना गावठाणच नाहीत अगर शासकीय नियमाप्रमाणे गावठाण घोषित नाहीत. गावठाण हद्दनिश्चिती होत नसल्याने तालुक्यात अवैध बांधकाम वाढत आहेत. मग आशा परस्थितीत स्थानिक भूमीपुत्र राहणार कोठे? महाबळेश्वर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने येथे शेती कमी प्रमाणात होते.
त्यामुळे येथिल स्थानिक भूमीपुत्र पर्यटनावर अवलंबून असतात. काही भूमीपुत्र न्याहरी निवास अंतर्गत उदरनिर्वाह चालवत आहेत. शासनाने स्थानिक भूमीपुत्रांच्या बांधकामांवर कारवाई केल्यास स्थानिकांना बेघर होण्याची वेळ येणार आहे.असेही यांनी सांगितले.
अवैध बांधकामांवर कारवाई करावी…
शासनाने गावठाण वाढीच्या निकषांची निश्चिती करुनच अवैध बांधकामांवर कारवाई करावी.महाबळेश्वर तालुक्यात गेल्या २० वर्षांत पर्यटनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. पर्यटनवाढीमुळे अनधिकृत बांधकामेही मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहेत.जी बांधकामे चुकीची झाली आहेत त्या बांधकामांवर शासनाने अवश्य कारवाई करावी. परंतु तालुक्यातील स्थानिक नागरिकांना कशा प्रकारे न्याय देता येईल यावर सहानुभूतीपूर्वक विचार करावा. अशी मागणी बैठकीत केली जाणार आहे. असे राजपुरे यांनी सांगितले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
दौंड तालुक्यातील अनधिकृत प्लॉटिंग धारकांना तहसिलदारांचा दणका ; नियम पाळा अन्यथा जमिनी सरकार जमा करू?
Raj Thackeray | राज ठाकरेंनी आपल्या भूमिकेवर ठाम राहावे ; आनंद दवे