Junnar News |जुन्नर, (पुणे) : जुन्नर मानमोडी डोंगर रांगेत असलेल्या भूतलेणी या लेणी समूहात लेणी पहाण्यासाठी आलेल्या मुंबईतील ८ पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे.
यामध्ये सर्वजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जुन्नर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना शनिवारी (ता. २५) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
पुष्पावती कांबळे, प्रियदर्शन कांबळे, आरती वाघमारे, सुवर्णा कांबळे, पंडित थोरात व आणखी तिघेजण अशी जखमी झालेल्या पर्यटकांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जुन्नर परिसरात असणाऱ्या मानमोडी डोंगर रांगेत भुतलेनी हा लेण्यांचा समूह आहे. अनेक पर्यटक या ठिकाणी या लेणी पाहण्यासाठी येत असतात. मुंबईहून काही पर्यटक शनिवारी दुपारच्या सुमारास पर्यटनासाठी आले होते. लेण्यांच्या कोपऱ्यात मधमाशांचे पोळे बसलेले होते. लेण्यांमध्ये अंधार असल्याने पर्यटकांनी मोबाइलची लाइट सुरू केली.
मोबाइलची लाइट ब्लिंक करत असल्याने मधमाशांचे लक्ष विचलित…
फोटो काढत असताना मोबाइलची लाइट ब्लिंक करत असल्याने मधमाशांचे लक्ष विचलित झाले. आणि त्यांनी काही क्षणात पर्यटकांवर हल्ला चढवला. आपले मोबाइल आणि साहित्य तिथे ठेवून पर्यटकांनी जीव वाचवत घटनास्थळावरून पळ काढला. मात्र, मधमाशांनी हल्ल्यात त्यांना जखमी केले. या घटनेमुळे या ठिकाणी आलेल्या इतर पर्यटकांनाही तिथून काढता पाय घ्यावा लागला.
दरम्यान, या मधमाशांच्या हल्ल्यातून वाचवण्यासाठी प्रशांत कबाडी, वनरक्षक रमेश खरमाळे, तेजस शिंदे, ऋषिकेश गाढवे, भरत चिलप, दिपक सांगडे यांनी पर्यटकांना मदत केली. जखमी पर्यटकांवर जुन्नर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
Junnar News | पुणे : तरुणावर बिबट्याने अचानक केला हल्ला आणि मग
LPG Subsidy | Good News : एलपीजी सिलेंडरवर आता मिळणार सबसिडी ; केंद्र सरकारचा नागरिकांना मोठा दिलासा