Crime News | पुणे : पिंपरी-चिंचवड शहरात दोन पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच पुणे शहरातील खडकी परिसरात वाहतूक पोलीसाला भरधाव कार चाकलाने बोनेटवरून 50 मीटरपर्यंत फरफटत नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
खडकी पोलिस ठाण्याच्या समोरील चर्च चौकात घडली घटना…
हा प्रकार खडकी पोलिस ठाण्याच्या समोरील चर्च चौकात शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडला आहे. दरम्यान पोलीसांवर होणाऱ्या अशा हल्लावरून पुन्हा एकदा सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
याप्रकणी, तात्काळ खडकी पोलीसांनी वाहनचाकास ताब्यात घेतले आहे. सुरज भारत जाधव (29, रा. चंचला बिल्डींग, फ्लॅट नं. 10, करलोटा नगर, देहूरोड, मामुर्डी, जि. पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. यासंदर्भात पोलिस अंमलदार गणेश शिवाजी राबाडे (33, वाहतूक विभाग, खडकी) यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस अंमलदार राबाडे हे पोलिस हवालदार विजय धर्मा आढारी यांच्यासह खडकी पोलिस ठाण्याच्या समोरील चर्चा चौकात शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास वाहतुक नियमन करत होते. त्यावेळी रेल्वे अंडरपासकडून लेन कट करून आलेल्या एक्सेंन्ट कार नंबर एमएच 12 क्युजी 4265 ला त्यांनी थांबविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपी सुरज भारत जाधवने कार न थांबवता राबाडे यांच्यावर अंगावर कार घालण्याचा प्रयत्न केला. स्वतःचा बचाव करण्यासाठी राबाडे यांनी बॉनेटवर उडी मारली.
दरम्यान आरोपी सुरजने कार न थांबविता तशीच कार सुमारे 50 मीटर पुढे नेले आणि राबाडे यांना फरफटत नेले. यावेळी तेथे असलेल्या नागरिकांनी सुरजला कार थांबविण्यास भाग पाडले. या घटनेमध्ये राबाडे यांच्या डाव्या पायाच्या घोट्यास मार लागला असून ते जखमी झाले आहेत. पुढील तपास पोलीस करत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Chakan Crime | मित्रांसोबत खेळायला गेला अन् पुन्हा परतलाच नाही
Pune Crime | धक्कादायक : हाय होल्टेजच्या वायरने लागली रूमला भीषण आग; आगीत चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू