लहू चव्हाण
(Panchgani News) पाचगणी : भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस व महाराष्ट्राचे माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी काल पुस्तकांच्या गावास सपत्नीक सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी भाजप कार्यालय, पुस्तकांचे गाव प्रशासकीय कार्यालय, बाळासाहेब भिलारे यांचे स्मारक भूतेश्वर मंदिर व समन्वय समितीचे माजी अध्यक्ष प्रवीण भिलारे यांची घरी जाऊन भेट घेतली.
पुस्तकांच्या गावचे संकल्पक म्हणून विनोद तावडे यांचे भिलार गावाशी घनिष्ट संबंध जोडले असल्याने नुकतेच समन्वय समितीचे माजी अध्यक्ष प्रवीण भिलारे यांच्या कन्येच्या शुभविवाह प्रसंगी तावडे यांना येता न आल्याने त्यांच्या घरी आज विनोद तावडे सपत्नीक आले होते. यावेळी त्या दोघांचा भिलारे परिवाराने यथोचित सन्मान केला. त्यानंतर तावडे यांनी भाजप संपर्क कार्यालयाला भेट दिली. यावेळी अनिल नाना भिलारे , तानाजी भिलारे, किसन शेठ भिलारे, वैशाली भिलारे यांनी त्यांचे स्वागत केले.
दरम्यान, तावडे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर तावडे यांनी पुस्तकांच्या गाव या प्रशासकीय कार्यालयाला भेट दिली. यावेळी सरपंच शिवाजी भिलारे, शशिकांत भिलारे, राजेंद्र भिलारे, सुनीता भिलारे, विनय मावळनकर, बालाजी हळदे, राजेश जाधव व कर्मचारी आदी उपस्थित होते. यावेळी त्यांनी वर्षात राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती घेतली. दोन नवी दालने सुरू करण्यासंदर्भात व नवीन पुस्तकांच्या बाबतीत निधी मिळवू देऊ असे तावडे यांनी आश्वासन दिले.
हीलरेंज हायस्कूल मधील कै. बाळासाहेब भिलारे यांच्या पुतळ्याला तावडे यांनी अभिवादन करत दर्शन घेतले. दादा अजूनही भिलारमध्येच आहेत याची जाणीव या पुतळ्याजवळ आल्यावर होते असे त्यांनी सांगितले. या वेळी नितींनदादा भिलारे, तेजस्विनी भिलारे आदी यावेळी उपस्थित होते.