पुणे : २६ जुलै कारगिल शहीद दिन असतो. याचे निमित्त साधून शहिदांना अभिवादन करण्यासाठी रक्तदान शिबिर आयोजित केले होते. रक्तदान शिबिरामध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक रक्तदात्यांना सुरक्षेसाठीक्लबच्या वतीने हेल्मेट देण्यात आले आहे. असे डॉ.अमर शिंदे यांनी सांगितले आहे.
कारगिल शहीद दिनानिमित्त पुणे येथील अमनोरा फर्न क्लब हाऊसमध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे आयोजन रोटरी क्लब अमनोराने केले होते. या शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी होऊन रोटरी सदस्य, नागरिक व अमानोरा सुरक्षारक्षकांनी रक्तदान केले आहे.
रोटरी क्लब ही जगातील 220 देशात सामाजिक कार्यात अग्रेसर संस्था आहे, या संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात, रोटरी क्लब अमनोरा पुणेच्या वतीने प्लास्टिक निर्मूलन, पाणी वाचवा, रक्तदान अशा विविध विषयांवर उपक्रम राबवित असल्याचे रोटरी क्लबच्या पदाधिकारी निनाद शेलार, शमीम बुट्वाला, सरस्वती व्यंकट यांनी आवर्जून सांगितले.
दरम्यान, या रक्तदान शिबिर संपन्न होण्यासाठी डॉ.कमलजीत सिद्धू यांनी विशेष प्रयत्न केले. तर ओम ब्लड बँके व अमानोरा फेर्न क्लब यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. तर सिटी कार्पोरेशनचे सुनील तरटे आणि सोनल जोशी यांनी आयोजकांचे आभार मानले.
यावेळी क्लबचे अध्यक्ष निनाद शेलार, सेक्रेटरी डॉ.मंजू रस्तोगी, वैदकीय संचालक डॉ.अमर शिंदे, सदस्य सरस्वती व्यंकट, डॉ.गीता मोहन, अंकित अग्रवाल, डॉ विनोद मिधा, डॉ शशिकांत सक्सेना, हर्षा जोशी, माजी अध्यक्ष प्रमोद धोकानिया, डी डी मिश्रा, सुजल शाह, डॉ प्रीती शिंदे, नवीन कुमार, गुरुप्रसाद बी.एल, शली गोहिल, श्रवण आंबरे, राज उद्धव इत्यादी रोटरी क्लब अमनोरा पुणेचे सदस्य उपस्थित होते.