(Mohol Crime) मोहोळ : बायकोस नांदायला का पाठवत नाही असे म्हणून दाजीने मेव्हण्यावर चाकूहल्ला केल्याची धक्कादायक घटना मोहोळ (जि. सोलापूर) येथे बुधवारी (ता.१५) संध्याकाळच्या सुमारास घडली. या हल्ल्यात मेव्हणा गंभीर जखमी झाला आहे. तर दाजीच्या विरोधात मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…!
नितीन सोनटक्के (वय ३०, रा. मोहोळ) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी नितीनचा मेव्हणा रेवणसिध्द होनमाने ( वय २६, रा. मोहोळ ) यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नितीन सोनटक्के यांचा फिर्यादी रेवणसिध्द होनमाने यांच्या बहिणीशी विवाह झाला आहे. तर आरोपी आणि फिर्यादी हे
दरम्यान, गुरूवारी सायंकाळी नितीन हा पत्नी माहेरी राहत असलेल्या मेव्हणा रेवणसिध्द होनमाने याच्या घरी गेला. आणि जेवण्यासाठी म्हणून पत्नीकडून तीनशे रूपये घेतले. त्या पैशाने दारू प्याला. आणि थोडया वेळाने आरोपी नितीन सोनटक्के घरी आला.
आरोपी घरी आल्यानंतर मेव्हणा रेवणसिध्द होनमाने याला म्हणाला की, माझ्या बायकोस नांदायला का पाठवत नाही असे म्हणून त्याच्याजवळ असलेल्या चाकूने मेव्हणा रेवणसिध्द याच्या गळयावर आणि नाकावर वार केले. तसेच मेव्हण्याच्या घरातील कोणालाही जिंवत सोडणार नाही. अशी धमकी आरोपीने दिली आहे. अशी फिर्याद रेवणसिध्द होनमाने यांनी दिली आहे.
त्यानुसार मोहोळ पोलीस ठाण्यात नितीन सोनटक्के याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे.नात्याने दाजी आणि मेव्हणे आहेत. आरोपी नितीन सोनटक्के आणि त्याची पत्नी यांचा मागील चार ते पाच दिवसापूर्वी पत्नीबरोबर वाद झाला होता. या वादामुळे आरोपीची पत्नी माहेरी मुलांना घेवून राहण्यास आली होती.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Sangli Crime : हृदयद्रावक ! कुरळप येथे 4 वर्षाच्या मुलीचा विहिरीत टाकून बापानेच घेतला जीव!