( Solapur Crime )सोलापूर : हातात पिस्तूल घेऊन हात सोडून बुलेट चालविण्याचा स्टंट करणे सोलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या मुलाला चांगलेच महागात पडले आहे. स्टंटबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर दोघांवर सोलापुरातील ( Solapur Crime ) सलगर वस्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चेतन नागेश गायकवाड आणि राजू भंडारी असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस कर्मचारी सचिन शिंदे यांनी सरकारच्या वतीने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
स्टंटबाजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामवाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नागेश गायकवाड यांचा मुलगा चेतन गायकवाड याने व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हात सोडून बुलेट चालवत आहेत आणि त्यांनी हातात पिस्तूल घेऊन स्टंटबाजी देखील केली आहे. त्याबाबतचे काही रिल्स तयार करून गायकवाड आणि राजू भंडारी या दोघांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तर सोशल मिडीयावर केलेले हे रिल्स गायकवाड आणि भंडारी यांच्या अंगलट आले आहेत.
पोलिस कर्मचारी सचिन शिंदे यांनी नगरसेवक पुत्राविरोधात फिर्याद दिली आहे. त्यानंतर रिल्स तयार करणारे चेतन गायकवाड आणि राजू भंडारी यांच्यावर भा. दं. वि. ५०५, २७९ व भारतीय शस्त्र अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, व्हिडिओमध्ये स्टंटबाजी करण्यासाठी वापरण्यात आलेली पिस्तूल पोलीसांकडून जप्त केली जाणार आहे. ती पिस्तूल खरी आहे का, याची पडताळणी केली जाणार आहे. ती खरी असेल तर पोलिस पिस्तूल जप्तीची कारवाई करू शकतात. तसेच, त्यांच्याडे शस्त्र परवाना आहे का नाही, याची पोलिस तपासात चौकशी होणार आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
Solapur Crime News : बनावट शिक्षक तयार करून मुख्याध्यापकानेच हडपला साडेतीन लाख रुपयांचा पगार
Bhor News : बैलाच्या निधनानंतर शेतकऱ्याने घातला चक्क तेरावा, भोर तालुक्यातील कान्हावडी येथील घटना