पुणे : Pune News : देशामध्ये सर्व धर्म ,पंथांचे लोक आनंदाने व सुखाने (All religions should live together happily) राहिले पाहिजे, असे मत पुणे विभागाचे धर्मगुरू बिशप थॉमस डाबरे (Bishop Thomas Dabre) यांनी मत व्यक्त केले. Pune News) पुण्यातील पहिल्या राष्ट्रीय अल्पसंख्याक परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. (Pune News)
उपस्थितांची नावे
ज्येष्ठ साहित्यिक अन्वर राजन, माजी आमदार मोहन जोशी, जुन्नरचे माजी नगरसेवक जमीर कागदी, रशीद शेख, अँथोनी जेकेब, सुवर्णा डंबाळे, जुबेर मेमन, अल्ताफ पिरजादे, सत्यवान गायकवाड, किरण सोनावणे, साहित्यिक, विचारवंत, विविध पक्ष संघटना तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .
पुढे ते म्हणाले की, ”सर्व धर्माचं तत्वज्ञान हे मानवता आणि जगावर प्रेमच करायला शिकवते. त्याचे पालन केल्यास सारे विश्व हे सुख आणि समाधानाने नांदेल. प्रत्येकाने दुसऱ्या धर्म आणि संस्कृतीचा आदर करावा.” तसेच सर्व धर्माच्या लोकांनीच देश घडवला आहे. त्यामुळे सर्वांनी मिळून एकमेकांना न्याय मिळवून दिला पाहिजे व सर्वांनी संविधानाचे पालन केले पाहिजे. असेही त्या्ंनी यावेळी सांगितले.
शांती व सुख यावरून देशाची श्रीमंती गणली जाते. प्रत्येक देशात कोणता ना कोणता धर्म अल्पसंख्याक असतो. कुठे मुस्लिम अल्पसंख्यांक तर कुठे ख्रिस्ती तर कुठे हिंदू असे सारेच धर्म कुठल्या ना कुठल्या देशात अल्पसंख्याक आहेत. त्यामुळे प्रत्येक देशात अल्पसंख्याक समाजासाठी विशेष लक्ष दिले जाते. असे मत या राष्ट्रीय परिषदेचे प्रमुख वक्ते माजी आयपीएस अब्दर रेहमान यांनी व्यक्त केले.
दरम्यान, या देशात प्लंबर, सुतार, मेकॅनिक यासारखे अनेक कारागीर हे अल्पसंख्यांक आहेत. देशाच्या जडनघडणीत त्यांचा हातभार लागत असतो. आज अल्पसंख्यांक समाजाच्या विविध योजना शिष्यवृत्त्या बंद असल्याचे त्यांनी सांगितले.
विशेष संधी नव्हे तर किमान समान अधिकार तरी अल्पसंख्यांकांना मिळायला हवेत असे ते म्हणाले. परिषदेत अल्पसंख्यांकांच्या हिताचे १४ ठराव मांडण्यात आले असून पुर्ततेसाठी प्रयत्न करण्यात येईल, असे राष्ट्रीय अल्पसंख्यक परिषदेचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी केले.या परिषदेचे आयोजन राहुल डंबाळे, अंजुम इनामदार, लुकास केदारी यांनी केले.