सागर जगदाळे
(Bhigvan Accident News) भिगवण : पुणे-सोलापूर महामार्गावरील स्वामी चिंचोली (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीत चालकाचे चारचाकी गाडीवरील नियंत्रण सुटल्याने दोघांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. तर तिघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी (ता. १२) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
वैभव विठ्ठल जांभळे (वय -२४, रा. तक्रारवाडी, ता. इंदापूर) प्रतीक पप्पू गवळी (वय – २२ रा. मोशी ता. हवेली) अशी अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत.
तर या अपघातात आसिफ बशीर खान (वय – २२ रा. भिगवन, ता. इंदापूर) सुरज राजू शेळके वय – २३ वर्ष रा. भिगवण ता. इंदापुर) व ऋषिकेश बाळासाहेब येळे वय -२२, रा. इंदापूर ता. इंदापूर) अशी अपघातात जखमी झालेल्या तिघांची नावे आहेत. जखमींवर भिगवण येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
रविवार ठरला घातवार…
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे – सोलापूर महामार्गावरून सोलापूरच्या दिशेने हे पाचही जण चारचाकी गाडीतून निघाले होते. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास हॉटेल पंचरत्न जवळ येताच कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने पलटली.यामध्ये दोघांचा जागेवरच मृत्यू झाला तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
दरम्यान, यामध्ये रस्त्यावरच चारचाकी गाडीने ४ ते ५ पलट्या मारल्याची माहिती स्थानिकांनी दिली. मयत वैभव जांभळे गावामध्ये टेलरिंग चा व्यवसाय करत होते अतिशय कमी वयामध्ये त्यांनी आपला या व्यवसायामध्ये जम बसवलेला होता त तर मयत तर मयत प्रतीक गवळी हा दत्तकला शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत होता आज रंगपंचमीच्या दिवशी घडलेले या घटनेने दोन्ही कुटुंबावरती मोठा दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरामध्ये व्यक्त केली जात आहे.
तपास रावणगाव पोलिस करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
Accident News : जुना पुणे-मुंबई महामार्गावर अपघात; भरधाव बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू