लहू चव्हाण
(Politics News) पाचगणी : दीर्घकाळापासून सत्तेत असणाऱ्या राष्ट्रीय पक्ष काँग्रेसची (congress) आज काय अवस्था आहे. हे आपण पाहतोय. अलीकडच्या काळात भाजपने देशात भरारी घेतली आहे. भाजपची घौडदौड सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत निर्माण केलेल्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे,असे आवाहन खासदार छत्रपती उदयनराजे भोसले (udayanraje bhosale) यांनी केले.
भिलार, ता. महाबळेश्वर येथील जन्नी माता मंदिर सभागृहात सातारा जिल्हा भाजपा कार्यकारिणीची बैठक आणि दोन दिवसीय अभ्यासवर्ग शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी उदयनराजे बोलत होते.
यावेळी अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे, माजी आमदार मदन भोसले, धैर्यशील पाटील, मनोज घोरपडे, प्रदेश सरचिटणीस सुदर्शन पाटस्कर, दत्ता थोरात, सुवर्णा पाटील, रामकृष्ण वेताळ, अविनाश फरांदे, डॉ. सुरभी चव्हाण-भोसले आदी उपस्थिती होते.
उदयनराजे म्हणाले की, ”काॅंग्रेस पक्षाने फक्त घोषणा केल्या परंतु त्या पुर्ण केल्या नाहीत. मोदींनी त्या पुर्ण केल्या. जो पर्यंत सर्वसामान्यांच्या हातात सुत्र देत नाही तोपर्यंत लोकशाही उदयास येणार नाही.” आपल्या देशातील शेतकरीवर्ग सधन झाला तरच व्यवसाय चालणार आहेत. भाजप कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त लोकांना पक्षाशी जोडण्याचं काम करावे. असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
घरेलु कामगार महिलांना सुषमा स्वराज ॲवाॅर्ड देऊन सन्मानित…
सातारा जिल्हा परिषद व जिल्हा बँकेवर भाजपचा झेंडा फडकविण्याचा संकल्प करण्याचे आवाहन यावेळी गोरे यांनी केले.पाटील म्हणाले, ”ग्रामपंचायत, पंचायत संमिती व जिल्हा परिषद या निवडणुकांसाठी आपण जोरदार तयारी केली पाहिजे. तालुकाध्यक्षांनी संघटनात्मक काम केले पाहिजे. संघाच्या शाखेत गेले पाहिजे.”
यावेळी घरेलु कामगार महिलांना सुषमा स्वराज ॲवाॅर्ड देऊन सन्मानित करण्यात आले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांची निधीची मागणी : पाचगणीत विकासकांना महिनाभरात कामाला सुरुवात होईल
पाचगणी नगरपरिषदेचा ६५ कोटींचा अर्थसंकल्प प्रशासकीय सभेत मंजूर