मुंबई : मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून विधानसभा कामकाजाला आज सुरुवात झााली. यावेळी कामकाज सुरु होण्यापूर्वीच सुरुवातीला पुणे पोटनिवडणुकीतून विजयी झालेले नवनिर्वाचित कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर आणि चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar)यांनी दोन्ही आमदारांना शपथ दिली. त्यानंतर विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात झाली. महाराष्ट्राचे आज अर्थसंकल्प राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प मांडला जात आहे. राज्यातील जनतेचे या संकल्पाकडे लक्ष लागून राहिले आहे.