दौंड, (पुणे) : गळ्यावर धारधार शास्त्राने वार करून त्याचा मृतदेह ऊसाच्या पाचटात लपवून ठेऊन दोघेजण पसार झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. पेडगाव (ता. दौंड) येथे ही घटना सोमवारी (ता. ०६) सकाळी उघडकीस आली आहे.
चंद्रकांत (वय-५५) असे खून झालेल्या कामगाराचे नाव आहे. हरिभाऊ वाघमारे व एक महिला (दोघे रा. मु. पो. नागठणे, पाली ता. रोहा जि. रायगड) अशी संशयित आरोपींची नावे आहेत.
याबाबत दिलीप शंभू सांगळे (रा. शिरापूर ता. दौंड जि. पुणे) यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप सांगळे हे बाभळीच्या झाडांचा कोळशा काढून विकण्याचे व्यापारी आहेत. २८ फेब्रुवारीला एकनाथ हरिश्चंद्र कापरे ( रा. निवी आदिवासी वाडी ता. रोहा, जि. रायगड) यांनी फोन करून कोळसा काढण्यासाठी घरून चार मजुर घेऊन आलो आहे, असे सांगितले. त्यानंतर सांगळे यांनी एकनाथ कापरे याने ते मजूर पेडगाव येथील रामभाऊ सोनबा गोधडे यांच्या मालकीचे शेतामध्ये नेले व तेथे त्यांना सोडले. गुरुवारी (ता. ०२) सांयकाळी पाच वाजण्याच्या सुमारास एक इसम व एक महिला हे कामासाठी घरी आले.
दोघांना सांगळे यांनी घरी मुक्कामाला थांबवले. दुसऱ्या दिवशी त्या दोघांना रामभाऊ गोधडे यांच्या मालकीचे शेतामध्ये कोळसा काढण्यासाठी सोडले, त्यावेळी तिथे चंद्रकांत (पूर्ण नाव पत्ता माहित नाही), किसन सोनू पवार (रा. परली जांबूळपाडा, गोंदव कातकरवाडी ता.खालापूर जि. रायगड) हे कामासाठी हजर होते.
दरम्यान, गोधडे त्यांना होळीचे सणासाठी पैसे देण्यासाठी गेले असता तेथे कोणी ही मजूर दिसले नाही. पेडगाव गावामध्ये शोध घेतला, परंतू तेथेही ते दिसले नाहीत. त्यानंतर गोधडे यांच्या शेतात साफसफाई करीत असताना ऊसाचे पाचटा खाली चंद्रकांतचा मृतदेह आढळून आला. त्याच्या उजव्या डोळयाजवळ तसेच गळयाचे खाली गंभीर दुखापत झाल्याने दिसून आले. याचा उजवा हात दंडातून मोडला आहे. अशा अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. याबाबत दिलीप सांगळे यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपींचा तपास दौंड पोलीस करीत आहेत.