पुणे : सोशल माध्याामातून व्हायरल व्हिडिओची चर्चा चांगलीच रंगत असते. व्हायरल व्हिडिओ आपल्याला काही ना काही शिकवून जातच असते. त्यामुळे लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत तर अभिनेत्यांपासून उद्योपतींना व्हायरल व्हिडिओची भुरळ पडत असते.अशीच भुरळ एका उद्योगपतीला पडली आहे.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा :
आपला देसी जुगाडाची महती जगात प्रसिध्द आहे. असेच एका मेंढपाळाचे जुगाड सध्या सोशल माध्यामातून व्हायरल होत आहे. मेंढ्या नेण्यासाठी शेतकऱ्याने एक जुगाड केले आहे.उद्योगपती हर्ष गोएंका यांनी हा व्हिडियो शेअर केला आहे. तस तर हर्ष गोएंका यांच्या प्रोफाइलमध्ये मनोरंजक आणि प्रेरणादायी ट्वीट्सचा संग्रह आहे. हर्ष गोयंका जुगाडच्या तंत्राने खूप प्रभावित झाले आहेत.
ट्विटरवर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती मेंढ्या चरताना दिसत आहे. विशेष म्हणजे तो प्राण्यांना मारत नाही किंवा रांगेत राहण्यासाठी काठी वापरत नाही. त्याऐवजी, कळप चाकांना जोडलेल्या ओपन-टॉप पिंजऱ्यात फिरताना दिसतो.जेव्हा माणूस पिंजऱ्याच्या बाजूने त्याचे वाहन चालवतो तेव्हा मेंढ्या कोणत्याही गोंधळाशिवाय गाडीच्या मागे जाताना दिसतात आणि जर तुम्ही बारकाईने पाहिले तर तुम्हाला एक कुत्रा देखील सावधपणे कळपावर लक्ष ठेवताना दिसतो. गोयंका यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, “कठीण समस्यांचे सोपे उपाय #जुगाड.”
हा व्हिडीओ 1 लाखाहून अधिक वेळा पाहिला गेला असून त्याला भरभरून प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. त्या व्यक्तीच्या जुगाड कौशल्याचे लोकांनी कौतुक केले. चालत्या वाहनानेही प्राण्यांना इजा होणार नाही याची खात्री तंत्रज्ञानाने कशी केली हे अनेकांनी लिहिले….
सोशल मीडिया एक असं प्लॅटफॉर्म आहे जिथे कधी काय वायरल होईल याचा काही नेम नाही. या सोशल मीडियामुळे जग जवळ आले आहे. रोज वेगवेगळे आणि हटके विडीयो सोशल मीडियावर वायरल होतच असतात. त्यापैकी काही व्हिडियोज केवळ टिप्स आणि ट्रिक्स सांगणारे असतात.
तर काही व्हिडियोज केवळ मनोरंजनासाठी बनवले जातात. आज जग व्हर्च्युअल होण्याकडे अग्रेसर आहे. रिल्स आणि फोटोज शेअर करत सोशल मीडियावर भरगोस प्रसिद्धी मिळावी म्हणून अनेकजण प्रयत्नशील असतात. त्यामुळे सोशल मीडियावर लोकप्रिय होण्यासाठी लोक कायम काही तरी वेगळं शेअर करण्याचा प्रयत्न करतच असतात.
वेगवेगळ्या प्रकारचे हे व्हिडियोज खास मनोरंजन करतात. मात्र काही थरारक असे व्हिडियोज देखील समोर येतात. रोज हजारो व्हिडिओ इंटरनेटवर अपलोड होत असतात. मात्र त्यापैकी मोजकेच व्हिडिओ व्हायरल होतात. काही हटके आणि खास व्हिडिओ असतात जे नेटकऱ्यांचे मन जिंकून घेतात. आणि त्यामुळे सगळीकडेच अल्पावधीत वायरल होतात.