पिंपरी : देहूरोड येथील आर्मी हेडक्वार्टर जवळ असलेल्या स्टोअर रूम मधून ७० हजार रुपयांचे साहित्य चोरीला गेल्याची घटना मंगळवारी (ता.२८) उघडकीस आली आहे.
याप्रकरणी रामकृष्णा जनार्दनराव हडपा (वय-३९, रा. आर्मी क्वार्टर्स, देहूरोड) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकार हा १२ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी या कालावधीत घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहूरोड येथील सिग्नल रेजिमेंट ७८७ एडी ब्रिगेड कंपनीच्या आर्मी स्टेशन हेड क्वार्टर आहे. या हेड क्वार्टरजवळ केटी लाईन्स बिल्डिंग मध्ये आर्मीचे स्टोअर रूम आहे. या स्टोअर रूमचा दरवाजा तोडून अज्ञात चोरट्यांनी ६८ हजार ५०० रुपये किंमतीचे सामान चोरून नेले आहे.