पुणे : इंदुरीकर महाराजांचे कीर्तन म्हटले की अभंग अन् दृष्टांत सांगत मधूनच काही विनोद सांगून उपस्थितांना हसवितात. मात्र एका आयोजित किर्तनात वेगळेच झाले. किर्तन सुरू असताना ‘हाई झुमकावाली पोर..’ या अहिराणी गाण्यावर लहान मुलाने ठेका धरला. इतकेच नाही तर इंदुरीकर महाराजांनी किर्तन थांबवून मुलाला स्टेजवर बोलावर नाचायलाय लावले. या सर्व प्रकाराचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.
व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा :
कीर्तनकार इंदुरीकर महाराजांचे कीर्तन सुरू असताना एका मुलाने ‘हायी झुमकावाली पोर’ या गाण्यावर ठेका धरला. यावेळी इंदुरीकर महाराजांनी जणू काही कीर्तनच थांबवले आणि मुलाला मंचावर बोलावलं. या चिमुकल्याने इंदुरीकर महाराजांच्या समोर ‘हाई झुमका वाली पोर’ या गीत गाताना ठेका धरला. हा चिमुकला कीर्तनात अगदी पहिल्याच रांगेत बसला होता. त्यामुळे इंदुरीकर महाराजांना त्याचं नृत्य करणं आणि गाणं म्हणणं सहज निदर्शनास आलं.
इंदुरीकर महाराजांनी या चिमुकल्याला पाहिल्यानंतर त्यांनी त्या मुलाला स्टेजवर बोलावलं. त्यानंतर त्याला स्टेजवर गाणं म्हणून नाचायला सांगितलं. विशेष म्हणजे हा चिमुकला भर मंचावर बेधडकपणे इंदुकरीकर महाराजांच्या बाजूला उभा राहीला. त्याने माईक खाली करायला लावला आणि गाणं म्हणत ठेका धरला. यावेळी इंदुरीकर महाराजांनी स्वत:च्या डोक्यावर हात ठेवला आणि कीर्तनाला उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
हा सगळा प्रकार घडत असताना श्रोत्यांमधील एका व्यक्तीने संपूर्ण घटना आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केलीय. चिमुकल्याचा इंदुरीकर महाराजांच्या बाजूला उभं राहून गाणं म्हणत नृत्य करण्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
दरम्यान, संबंधित व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक जण चिमुकल्याच्या बेधडकपणाचं कौतुक करत आहेत. संबंधित घटना ही मजेशीर अशीच आहे. विशेष म्हणजे इंदुरीकर महाराजांनीदेखील यातून सर्वांना आनंदच देण्याचा प्रयत्न केल्याचं या व्हिडीओतून दिसून येत आहे.