शिरुर : निमोणे – मोटेवाडी रोड लगत चार दिवसांपुर्वी निमोणे ग्रामपंचायत हद्दीत झालेल्या खुनाच्या ठिकाणी त्याच्याच नातेवाईकांच्या एका शेतमजूराने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे खून व आत्महत्या एकच ठिकाणी झाल्याने निमोणे परिसरात वेगवेगळया चर्चेला उधान आले असून पोलिसांसमोर तपास करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
छोटु पुर्ण नाव व पत्ता माहित नाही (वय अंदाजे ४० ते ४५ वर्षे, रा. निमोणे, शिरूर) असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी निमोणे गावच्या पोलिस पाटील इंदिरा बापू जाधव यांनी शिरुर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निमोणे – मोटेवाडी रोड लगत निमोणे ग्रामपंचायत हद्दीत बुधवारी (ता. ०८) संध्याकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास निमोणे गावातील एका हॉटेल व्यावसायिकाचा पोलीस पाटील इंदीरा जाधव यांच्या पतीच्या मोबाईलवर फोन आला व त्याने सांगितले की, शशिकांत सुदाम काळे यांच्या शेतात कामास असलेला शेतमजुर छोटु (पुर्ण नाव पत्ता माहित नाही) याने निमोणे गावच्या हद्दीतील जालिंदर राधाकृष्ण काळे यांच्या शेतातील आंब्याच्या झाडाला एका दोरीच्या साह्याने गळफास घेतला आहे.
हा व्यक्ती काही दिवसांपुर्वी शशिकांत काळे यांच्याकडे शेतमजूर म्हणून कामाला आला होता. या व्यक्तीकडे आधारकार्ड व कुठलेही कागदपत्रे नसल्याने तो नेमका कुठला व कोण याबाबत कसलीही माहीती उपलब्ध नाही. त्यामुळे खुन झाल्यानंतर त्याच ठिकाणे या व्यक्तीने आत्महत्या केल्याने परीसरात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, मनोहर शितोळे यांचा निमोणे-मोटेवाडी रस्त्यालगत अज्ञात इसमाने चेहऱ्यावर, कमरेवर, पाठीवर, गुप्तांगावर ठिकठिकाणी मारहाण करून मनोहर शितोळे यांना गंभीर जखमी करून त्यांचा निर्घृणपणे खुन केला होता. त्याच ठिकाणी या शेतमजूराने फाशी घेतल्याने या दोन्ही घटनेचा परस्पर घटनेशी काही संबंध आहे का? याचा तपास शिरूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर हे करत आहेत.