राजगुरूनगर (पुणे) : मित्रांबरोबर आलेला तरुण पोहायला न आल्याने पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेल्याची घटना दावडी (ता. खेड) ग्रामपंचायत हद्दीत रविवारी (ता. ०५) घडली आहे.
सचिन विभिषण घारगे (वय २२ रा. तळवडे ता. हवेली) असे पाण्यात वाहून गेलेल्या युवकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सचिन घारगे, शिवप्रकाश माने, विशाल चव्हाण, आदित्य पाटील हे सर्वजण एका हॉटेलवर जेवण करण्यासाठी गेले होते. जेवण झाल्यानंतर सोमवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास सर्व मित्र पोहण्यासाठी आमराळवाडी दावडी येथून जाणाऱ्या चासकमान धरणाच्या डाव्या कालव्यावर आले होते.
कालवा तुंडूंब भरून वाहत असल्याने सचिन घारगे हा मित्राला म्हणाला मला पोहता येते, आणि तो पाण्यात पोहण्यासाठी उतरला परंतु त्याला पोहता आले नाही. पाण्याच्या प्रवाहाबरोबर तो वाहून गेला, त्याच्या मित्रांनी शोध घेतला परंतु तो उद्याप मिळून आला नाही.
दरम्यान, या घटनेबाबत सचिन घारगे याचा मित्र अक्षय श्रीराम गायकवाड (रा. आळंदी देवाची ता. खेड) याने खेड पोलिस ठाण्यात खबर दिली आहे.