लहू चव्हाण
पाचगणी : गोडवली (पाचगणी ता.महाबळेश्वर) येथील भारती विद्यापीठ हायस्कूलमध्ये पाचगणी आरोग्य केंद्राच्या वतीने ५ वी ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी जागरूक पालक-सुदृढ बालक अभियान राबविण्यात आले.
६ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘जागरूक पालक,सुदृढ बालक’ उपक्रमा अंतर्गत पाचगणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने डॉक्टर नयन बरबडे, राजकुमार शिंगनाथ, आरोग्य सेवक हरिदास घुले,एस.एस.वंझारी यांनी भारती विद्यापीठ हायस्कूलमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांना सर्दी, खोकला, ताप आणि डोक्यापासून पायाच्या बोटापर्यंत सविस्तर तपासणी करण्यात आली. त्याचबरोबर मुलींच्या बाबतीत हिमोग्लोबिनची कमतरता आणि इतर बाबत उपचार, औषधे देवून, आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी सकाळी व्यायाम करण्याचा सल्ला दिला.
यावेळी मुख्याध्यापक शहाजी सावंत यांनी गुलाब पुष्प देऊन डाॅक्टर व त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत केले. यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेतर सेवक उपस्थित होते.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.अजित कदम म्हणाले हा उपक्रम शासनाचा आहे. या उपक्रमांतर्गत ज्या ठिकाणी बालके असतात, तेथे जाऊन तपासणी केली जाणार आहेत.
या तपासणीत कोणाला ही आजार असल्यास त्याच्यावरील उपचार हे शासनाच्या विविध योजनेनुसार किंवा शासनाशी संलग्न असणाऱ्या खासगी रुग्णालयात वेळप्रसंगी ते ही मोफत केले जातील.हा उपक्रम आठ आठवडे राबविण्यात येणार आहे.