पुणे : बंद पडलेला व्यवसाय सुरु करुन मशीन घेण्यासाठी पैसे लावल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून एक कोटी रुपये घेऊन प्रत्यक्षात कारखान्याची जागाही लिलावाद्वारे विकून फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकणी एका महिलेसह तीन जणांविरोधात डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राम निरंजन डागा व संदीप राम निरंजन डागा असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. धीरज शांतीलाल ओस्तवाल (वय. ४६, रा. एरंडवणे) असे फिर्याद दिलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओस्तवाल यांचा फर्ग्युसन रोडवरील श्रीकृष्ण अपार्टमेंट येथे व्यवसाय होता. तो काही कारणाने बंद पडला होता. आरोपींनी त्यांना बंद पडलेला व्यवसाय सुरु करण्यासाठी तसेच मशीन्स घेण्यासाठी पैसे लावल्यास व्यवसाय सुरु होईल. तसेच त्यातून उत्तम परतावा मिळेल, असे आमिष दाखविले.
त्यांच्याबरोबर फिर्यादी ओस्तवाल यांच्याबर करार देखी केला. त्यानंतर फिर्यादी यांच्याकडून १ कोटी ८ लाख ५३ हजार १३९ रुपये घेतले. प्रत्यक्षात त्या ठिकाणी कोणताही व्यवसाय सुरु केला नाही.
आपली फसवणूक झाल्याचे समजताच ओस्तवाल यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार एका महिलेसह तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.