पुणे : अहमदनगर ते कल्याण राष्ट्रीय महामार्गावर गांजा वाहतूक करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व ओतूर पोलीस यांनी संयुक्तरित्या कारवाई करीत ताब्यात घेतले आहे.
ऋषिकेश किसन वामन (वय ३२, रा. काळवाडी, ता. जुन्नर) व सतीश अशोक गुंजाळ (वय २६, रा. उंब्रज नं. १, ता. जुन्नर) असे ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे असू त्याच्याकडून पोलिसांनी १८ किलो २५५ ग्रॅम वजनाचा गांजा व ३ लाख ५० हजार किंमतीची गाडी असा ६ लाख ६० हजार ३५५ रुपयांचा माल जप्त जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (ता. ०२) स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस हवालदार दिपक साबळे व अक्षय नवले यांना अहमदनगर ते कल्याण राष्ट्रीय महामार्गवरून एटीओस कंपनीच्या ग्रे रंगाच्या गाडीमधून गांजाची वाहतुक होणार असल्याची खात्रीदायक माहिती मिळाली होती.
त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखा व ओतुर पोलीस यांनी संयुक्तपणे ओतूर येथील कॉलेजसमोरील रस्त्यावरील गतिरोधकाजवळ सापळा रचून गाडी थांबवून त्यांची व गाडीची झडती घेतली.
यावेळी वाहनामधील ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही इसमांकडे ३ लाख १० हजार ३५५ किंमतीचा १८ किलो २५५ ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. याबाबत ओतुर पोलीस स्टेशन येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस नाईक संदिप वारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.