सासवड : सासवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतिल कोडीत (बु) गावात रिक्षात देशी-विदेशी प्रकारच्या दारू विकणाऱ्या आरोपीला सासवड पोलिसांनी छापा टाकून अटक केली आहे. तसेच त्याच्याकडून सव्वा दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
उत्तम हरिभाऊ राजिवडे (वय – ५६, रा. कोडीत (बु), नंदी चौक, ता. पुरंदर) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी देशी विदेशी दारूच्या बाटल्यांचा साठा व ऑटो रिक्षा गाडी असा २ लाख १६ हजार ४४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (ता. ०२) सासवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतिल कोडीत (बु) गावाच्या हद्दीतील नंदी चौकात उत्तम राजिवडे हा त्याचे ऑटो रिक्षामध्ये देशी विदेशी दारूच्या बाटल्यांचा साठा जवळ बाळगुन ओळखीचे लोकांना विक्री करीत आहे, अशी माहिती सासवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप यांना मिळाली होती.
मिळालेल्या माहितीच्या अनुशंघाने सदर ठिकाणी पोलीस पथक गेले असता त्यांना उत्तम राजिवडे यांचे घरासमोर एका काळी पिवळ्या रंगाची रिक्षा गाडी दिसली. रिक्षाची पाहणी केली त्यात दोन खाकी रंगाच्या बॉक्समध्ये देशी विदेशी दारूच्या बाटल्या भरलेल्या दिसल्या. रिक्षात बसेलेल्या इसमास नाव पत्ता विचारता त्याने उत्तम राजिवडे असे सांगितले. त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून ऑटो रिक्षामध्ये असलेल्या देशी विदेशी दारूच्या बाटल्यांचा साठा व ऑटो रिक्षा गाडी असा २ लाख १६ हजार ४४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, बारामतीचे अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भाईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी भोर विभाग धनंजय पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सासवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप, पोलीस हवालदार रूपेश भगत, लियाकतअली मुजावर, गणेश पोटे, होमगार्ड विक्रम जगताप यांचे पथकाने केलेली आहे.