हडपसर : महाराष्ट्रातील एकही नागरिक वैद्यकीय उपचारापासून वंचित नाही राहिला पाहिजे. असा आग्रह उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस केला होता. या आग्रहातून त्यांचा वाढदिवस झगमगटात साजरा न करता गरीब व गरजूंना मोफत वैद्यकीय सेवा देऊन केला आहे. अशी माहिती आयोजन भाजपा ओबीसी मोर्चा पुणे शहर उपाध्यक्ष व स्मितसेवा फाउंडेशनच्या अध्यक्षा स्मिता तुषार गायकवाड यांनी दिली आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या ५२ व्या वाढदिवसानिमित्त हडपसर गाडीतळ व सातववाडी येथे आरोग्य शिबीर संपन्न झाले. यावेळी बोलताना वरील माहिती स्मिता गायकवाड यांनी दिली आहे. यावेळी ओबीसी मोर्चा अध्यक्ष योगेश पिंगळे, हडपसर विधानसभा अध्यक्ष संदीप दळवी, संघटन सरचिटणीस गणेश घुले, यशोधन आखाडे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना स्मिता गायकवाड म्हणाल्या कि, गेल्या काही वर्षापासून हडपसर परिसरात एक जनसेवक म्हणून सामाजिक कार्य करीत आहेत. तळागाळातील नागरिकांना केंद्रशासनाच्या व राज्यशासनाच्या योजना व सुविधा त्वरित मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्न करीत आहे. तसेच आदरणीय पंतप्रधान मोदी जी स्वतःला प्रधान सेवक म्हणतात, तीच प्रेरणा घेऊन मी स्वत:ला एक जनसेवक म्हणून आपल्या सेवेत कार्यरत आहे. असे गायकवाड यांनी यावेळी बोलताना सांगितले.
दरम्यान, हडपसर गाडीतळ येथील हे शिबीर विलू पूनावलाचे डॉ. किरण शहा व सीईओ डॉ. आर्य लाजपतरॉय आणि प्रजाभव हॉस्पिटलमध्ये डॉ विश्वनाथ चव्हाण यांच्या सहकार्याने हे शिबीर पार पडले. या शिबिराचे आयोजन भाजपा ओबीसी मोर्चा पुणे शहर उपाध्यक्ष व स्मितसेवा फाउंडेशनच्या अध्यक्षा स्मिता तुषार गायकवाड यांच्यावतीने करण्यात आले होते. तर या शिबीरासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक आणि महाराष्ट्र प्रदेश ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांचे विशेष सहकार्य मिळाले.
यावेळी डॉ अशोक सोरगावीकर, राजेंद्र चव्हाण, विजय नायर, गणेश काळे, काशिनाथ भुजबळ, देवीदास बिनवडे, पानसरे सर, शैलेंद्र बेल्हेकर, हरीभाऊ साळुंके, राकेश भोसले, रोहित कुलकर्णी, मंगलाताई रायकर, सोनल कोद्रे, रणभोर ताई, रुपाली पाटील, मोहीनी शिंदे, निकिता निगाले, शोभा ठाकरे, अलका शिंदे, अनिता कदम, शिला भास्करकट्टे , शर्मिला डांगमाळीआदि मान्यवर, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.