सातारा : सातारा जिल्ह्यातील नामांकित दैनिकाचे पत्रकार प्रशांत जाधव यांच्या मातोश्री शालन पोपट जाधव (वय -५५) याचे मकरसंक्रांतीच्या दिवशी आज रविवारी (ता.१५) हृदविकाराने निधन झाले.
कान्हरवाडी (ता खटाव) येथील ग्रामपंचायत सदस्या असलेल्या शालन जाधव यांच्या पश्चात दोन विवाहित मुले, विवाहित कन्या, पती, सुना-नातवंड, जावई असा मोठा परिवार आहे. सामाजिक बांधिलकी जपून त्यांनी अनेकांना सहकार्य केले.त्यांचा मुलगा प्रशांत जाधव हे पत्रकार तर प्रविण जाधव हे सेना दलात कार्यरत आहेत. रात्री उशिरा त्यांच्या पार्थिवावर कान्हरवाडी गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान, शालन जाधव यांच्या निधनाबद्दल जेष्ठ पत्रकार श्रीकांत कात्रे, डॉ. संतोष मोरे, पत्रकार अजित जगताप, शहाजीराजे गोडसे, कृणाल गडांकुश, योगेश जाधव,प्रतिक गोडसे व मान्यवरांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.