सुरेश घाडगे
परंडा : तत्कालीन परंडा तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांनी त्यांच्या कार्यकाळात सातबारा उताऱ्यावर मागील अनेक वर्षापासूनची असलेल्या कुळाच्या नोंदी नियमबाह्य कमी केल्याचा प्रकार माहिती अधिकारात समोर उघडकीस आला आहे. याप्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाने तहसीलदार रेणुकादास देवणीकर यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ( दि. २१ ) कारवाईची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी यांच्याकडे सहा माहिण्याआधी याबाबत निवेदन दिले होते. परंतु महसुल अधिकाऱ्याकंडुन तत्कालीन तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांची पाठराखण केली जात असल्याचा अरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी काहीच कारवाई होत नसल्याने माहिती आधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने गुरूवार दि २१ जूलै रोजी मुख्यमंत्र्यासह विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी यांना मागणीचे निवेदन दिले आहे . येत्या १० ऑगस्ट २०२२ पर्यंत कारवाई झाली नाही तर परंडा तहसील कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
तत्कालीन तहसीलदार हेळकर यांनी सातबारा उताऱ्यावरून कुळाच्या नोंदी नियमबाह्य पणे कमी केले असून याप्रकरणी मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाने केला आहे . हेळकर यांनी १४ ऑगस्ट २०१७ ते ९ ऑगस्ट २०२१ या कालावधीत तहसीलदार पदावर कार्यरत असताना त्यांनी हैद्राबाद कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियमानान्वे शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर असलेल्या कुळाच्या अनेक नोंदी नियमबाह्यपणे कमी केल्या आहेत. या प्रकरणात निर्णय घेताना अनियमित्तता झालेली आहे. काही प्रकरणात कुळधारकांना नोटीसा मिळाल्या नाहीत.
अनेक प्रकरणांमध्ये शेतमालकाकडून आर्थिक देवाण घेवान करून त्यांचे हित जोपासले आहे . अनेक प्रकरणात कागदपत्रावर खाडाखोड झाल्याचे दिसून येत आहे . हा प्रकार माहिती आधिकारात मिळालेल्या माहितीवरून समोर आला आहे . याप्रकरणी चौकशी होऊन दोषीवर कारवाई करावी, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाने केली आहे. यावेळी तालुकाध्यक्ष फारूक शेख , नवनाथ कसबे , विजय मेहर, नवनाथ साठे, अमित आगरकर, जमीर सिकलकर, असलम पल्ला, किशोर येवारे, आबा कोकाटे, राहुल बनसोडे, मुस्तकीम शेख, धनंजय गोफने ,निहाल सिकलकर, सिकंदर पठाण, ताहेर शेख, जावेद शेख,अज्जू पठाण उपस्थित होते.