पुणे : बारामती शहरातील आनंदनगर वसाहत आमराई येथे दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या हाणामारीमध्ये महिलांचा समावेश मोठ्या प्रमाणात होता. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारीनुसार दोन्ही गटातील १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धनंजय तेलंगे, ऋषिकेश तेलंगे, रोहित तेलंगे, चिंट्या सुतार, मयूर सुतार, तुषार शिंदे, करण शिंदे, गोविंद तेलंगे, बबलू कसबे, करण दिवटे (सर्व रा. आंबेडकर वसाहत आमराई बारामती) , तर दुसरा गटांतील आरोपी करण विलास सकट, श्याम विलास सकट, निलेश सकट, बेबीताई विलास सकट, रेश्मा सकट असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
मिळालेल्या माहिती नुसार, आनंदनगर वसाहत आमराई येथे दोन गटात तुंबळ हाणामारी सुरु होती. या हाणामारीत महिलांचा देखील समावेश होता. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलीस परिस्थिती शांत करीत असताना महिला पोलिसांच्या गाडीला सुद्धा आडव्या जात होत्या. त्यातील काही लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर, १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहे.