पुणे :- राष्ट्रवादी कॉग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या जवळचे समजले जाणाऱ्या प्रफुल्ल पटेल यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली असून त्यांची संपत्ती जप्त केली आहे. माजी मंत्री नवाब मलिक, अनिल देशमुख यांच्या पाठोपाठ प्रफुल्ल पटेल यांच्यावर ईडीने (#Action against Prafful Patel) मोठी कारवाई केल्याने राष्ट्रवादीत खळबळ उडाली आहे.
इक्बाल मिर्ची प्रकरणी प्रफुल्ल पटेल यांच्यावर इडीकडून ही करावाई झाल्याचे सांगितले जात आहे. वरळी येथील प्लॉट खेरदी प्रकरणी मनी लाँडरिंग झाल्याचा आरोप हा प्रफुल्ल पटेल यांच्यावर ठेवण्यात आला होता. दरम्यान ईडीने केलेल्या या कारवाईत पटेल यांच्या वरळी येथील घर जप्त केले आहे.