Saturday, May 17, 2025
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सीसीएमपी उत्तीर्ण होमिओपॅथिक वैद्यकीय व्यावसायिकांची ‘एमएमसी’मध्ये स्वतंत्र नोंद; वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांचे निर्देश

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 26 February 2025, 20:17

मुंबई: सीसीएमपी उत्तीर्ण होमिओपॅथिक वैद्यकीय व्यावसायिक डॉक्टरांची एमएमसी मध्ये स्वतंत्र नोंद घेण्याचे स्पष्ट निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिनांक २५ फेब्रुवारी रोजी मुंबई मंत्रालयात दिले. यामुळे सीसीएमपी उत्तीर्ण २२ हजार होमिओपॅथिक डॉक्टरांना थेट फायदा होणार आहे. त्यामुळे या निर्णयाचे होमिओपॅथिक डॉक्टरांनी जोरदार स्वागत केले आहे.

सीसीएमपी उत्तीर्ण होमिओपॅथिक डॉक्टरांची एमएमसी मध्ये स्वतंत्र नोंद घ्यावी, कौन्सिल सदस्य संख्या वाढविणे तसेच अधिनियमातील इतर दुरुस्त्यासंबंधी महाराष्ट्र होमिओपॅथी सल्लागार समितीने केलेल्या शिफारसीनुसार महाराष्ट्र होमिओपॅथिक प्रॅक्टिशनर ऍक्ट मधे दुरुस्त्या करणे व होमिओपॅथीच्या इतर प्रलंबित विषयावर दिनांक २५ फेब्रुवारी रोजी वैद्यकीय शिक्षण मंत्री, नामदार हसन मुश्रीफ यांच्या दालनात व्यापक बैठक संपन्न झाली.

या बैठकीस भारतीय जनता पक्षाचे मुख्य विधिमंडळ प्रतोद अकोला पूर्व मतदार संघाचे आमदार रणजीत सावरकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष डॉक्टर सेलचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. बाळासाहेब पवार, महाराष्ट्र शासनाच्या होमिओपॅथी सल्लागार समितीच्या अध्यक्ष डॉ. रजनीताई इंदुलकर, सदस्य डॉ. नितीन गावडे, महाराष्ट्र होमिओपॅथी परिषदेचे प्रशासक डॉ.बाहुबली शहा, समिती सदस्य डॉ. सुधीर म्हात्रे, अकोला जिल्हा होमिओपॅथिक संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण अग्रवाल,सचिव डॉ. प्रशांत सांगळे,इतर सदस्य तसेच वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर, प्रधान सचिव धीरजकुमार, आयुक्त वैद्यकीय शिक्षण व संशोधन डॉ.अजय चंदनवाले, अन्न व औषध प्रशासन आयुक्त राजेश नार्वेकर, महाराष्ट्राचे मुख्य औषध नियंत्रक डी. आर. गहाणेसाहेब,अन्न व औषध प्रशासन उपायुक्त डॉ. संतोष काळे, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य उपसचिव डॉ. तुषार पवार, कार्यसन अधिकारी अनिल चौरे, एमएमसी प्रबंधक डॉ. वाघमारे, एमसीएचचे मुख्य लिपिक दि.सा.भुयार, स्वीय सहाय्यक आंदळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

बैठकीत सर्वप्रथम डॉ. बाहुबली शहा यांनी सीसीएमपी कोर्स बाबतच्या सर्व कायदेशीर व तांत्रिक बाजूंचा ऊहापोह करून एमएमसी कोणतेही कारण नसताना अडवणुकीचे धोरण अवलंबून एक प्रकारे सरकार व विधी मंडळाला आव्हान देत असल्याचे प्रतिपादन केले. या संबंधी मंत्री हसन मुश्रीफ यांनी एमएमसी प्रबंधकांना विचारले असता त्यांनी कायद्यातील तरतुदी व परिशिष्टात क्रमांक २८ ला सीसीएमपी अर्हतेची नोंद असल्याचे कबूल केले.  मात्र कोर्ट केस ७८४७/२०१४ अनिर्णित असल्याने आम्ही नोंद करून घेत नाही असे सांगितले.

त्यावर डॉ. बाहुबली शहा आक्षेप घेत म्हणाले, “यासंदर्भात कोणत्याही न्यायालयाचा स्थगिती आदेश नसल्याचे सांगितले. तसेच कायदा विधिमंडळाने पारित केल्यानंतर व राज्यपालांनी तो राज्यात लागू केल्यानंतर जोवर कोणतेही न्यायालय असंवैधानिक ठरवून कायदा किंवा त्यातील विशिष्ट तरतुदी रद्द करत नाही किंवा त्याला स्थगिती देत नाही तोपर्यंत त्या कायद्याची अंमलबजावणी कुठली ही यंत्रणा रोखू शकत नाही”

त्यानंतर मंत्री हसन मुश्रीफ यांनी न्यायालयीन स्थगितीचा आदेश आहे का असे विचारले असता एम एम सी प्रबंधकांनी असा कोणताही आदेश नसल्याचे मान्य केले. या संबंधित विधी व न्याय विभागाचा अभिप्राय मागवण्याचे सुतोवाच केले. त्यावर देखील डॉ. बाहुबली शहा यांनी पुन्हा आक्षेप घेऊन ही कालहरण करण्याची क्लृप्ती असल्याचे सांगितले.

आमदार रणजीत सावरकर आक्रमकपणे भूमिका मांडत म्हणाले, “हस्तक्षेप करून विधेयकावेळी विधी व न्याय विभागाने जे काही मत द्यायचे ते दिले असून नंतर मंत्री मंडळ, विधिमंडळ व राज्यपाल यांच्या संमतीने कायदा अस्तित्वात आला आहे. आता विधी व न्याय विभागाचा यात काहीही संबंध येत नाही”. असे स्पष्ट सांगितले.

त्यानंतर मंत्री हसन मुश्रीफ यांनी ताबडतोब सीसीएमपी उत्तीर्ण होमिओपॅथिक वैद्यकीय व्यावसायिकांची एमएमसी मध्ये स्वतंत्र नोंद घेण्याचे  निर्देश एमएमसी प्रबंधक, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य प्रशासनास दिले.

यावेळी, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आमदार रणजीत सावरकर, राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलचे डॉ. बाळासाहेब पवार, होमिओपॅथी सल्लागार समिती अध्यक्ष डॉ. रजनी इंदुलकर,आयुक्त राजीव निवतकर, प्रधान सचिव धीरज कुमार,उपसचिव पवार, संचालक आयुष वैद्य रमण घुंगराळेकर, उपसंचालक होमिओपॅथी डॉ. स्वानंद सोनार यांचे या बैठकीत वस्तुनिष्ठ व सकारात्मक निर्णय घेतल्याबद्दल डॉ. बाहुबली शहा यांनी आभार मानले.

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

बीडमध्ये भीषण अपघात ; भरधाव कंटेनरने 8 ते 10 वाहनांना उडवले अन्…

Friday, 16 May 2025, 22:01

वारकरी संप्रदायाचे प्रचारक व ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. मधुकर महाराज गिरी यांचे निधन..

Friday, 16 May 2025, 21:44

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची अखेर पुणे शहरात बदली, नवीन पोलीस अधीक्षक कोण असणार?नागरिकांचे लक्ष

Friday, 16 May 2025, 21:06

धक्कादायक ; अज्ञात व्यक्तीकडून तरुणीवर चाकूने सपासप वार, रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह

Friday, 16 May 2025, 20:37

प्रवासी महिलांचे दागिने लुटणारी मांजरीतील चौघांची टोळी जेरबंद ; स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कामगिरी

Friday, 16 May 2025, 20:31

पुण्यात मेधा कुलकर्णी आणि शेखर चरेगावकर यांच्यातला वाद टोकाला ; काय आहे कारण?

Friday, 16 May 2025, 19:51
Next Post
two people beats traffic warden in bhosari pune

बळजबरीने बालविवाह, आईसह चार जणांवर गुन्हा; मुरूड ठाण्यात तक्रार दाखल

मुख्य संपादक : जनार्दन दांडगे

‭+91 9922232222‬
puneprimenews@gmail.com

Pune Prime News
Sunrise Complex, Loni Kalbhor (Station), Tal- Haveli Dist – Pune 412201

ट्रेंडिंग टॅग्स

" Bjp" " Maharashtra Politics" accident Accident News Ajit Pawar Assembly Election 2024 crime crime news crime pune daund news Devendra Fadnavis dist Eknath Shinde horoscope today indapur Indapur News india loni kalbhor Loni Kalbhor News maharashtra Maratha Reservation mumbai Mumbai News pimpari chinchwad pimpri chinchwad Pimpri News police political Political News politics Politics News pune pune city Pune Crime Pune Crime News Pune Dist pune news pune police satara sharad pawar shirur Shirur News SOLAPUR Sticky News uruli kanchan
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.