पुणे : राज्यातील पाऊसमानाचा धोका कमी झाल्याने पुणे जिल्ह्यातील सात तालुक्यांतील गडकिल्ले व पर्यटन स्थळांवर पर्यटनासाठी घातलेले निर्बंध जिल्हा प्रशासनाकडून शिथिल करण्यात आले असून पर्यटन स्थळे आता खुले करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी दिली आहे. असे असले तरी खबरदारी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
राज्यात आणि पुणे जिल्ह्यातील काही ठिकाणी झालेला मुसळधार पाऊस आणि दरडी कोसळण्याच्या घटना या सोबत हवामान खात्याने दिलेला रेड अलर्ट मुळे पुणे परिसर आणि जिल्ह्यातील ७ तालुक्यातील पर्यटन स्थळे, गड किल्ले, धरण, या ठिकाणी सामान्य नागरिकांना, पर्यटन करण्यासाठी 14 ते 17 जुलै 2022 दरम्यान बंदी घातली होती. मात्र कालपासून ती शिथिल करण्यात आली असून गड किल्ले यांच्या ठिकाणी पर्यटक उत्साहाने जात असल्याचे चित्र आहे.
हवेली, मावळ, मुळशी, भोर, वेल्हे, जुन्नर, आंबेगाव या तालुक्यातील पर्यटन स्थळांवर बंदी होती.