पुणे : वाघोलीत उभारण्यात आलेल्या नवीन पीएमपीने आता नवीन ई-डेपो पूर्ण क्षमतेने सुरू होण्या संदर्भातील कार्यवाही झाली असून येत्या दोन दिवसांत या डेपोतून १०५ ई-गाड्या सुटणार आहे. येथून दररोज ४० हजार प्रवास करणार्या प्रवाशांना वेळेत गाड्या उपलब्ध होणार आहेत.
असा असेल डेपो हा सव्वा तीन एकर क्षेत्रात विकसित करण्यात आला असून यापूर्वी ५० इगाड्या येथून सुटत असत. यामध्ये आता ५५ नवीन गाड्यांची भर पडणार आहे. या डेपोतून पूर्ण क्षमतेने १०५ गाड्या सुटणार आहेत. वाघोली डेपोमधून सुटणाऱ्या गाड्यांमध्ये सुमारे ४०,००० प्रवासी प्रवास करणार असून यामुळे वाघोली डेपोचे उत्पन्न प्रतिदिवस ६ लाख रुपये होणार आहे.
दरम्यान, काही दिवसांपासून वेळेत बस मिळत नसल्यामुळे वाघोलीकर नागरिक त्रस्त झाले होते. या भागातून धावणार्या गाड्या प्रवाशांची वाहतूक करण्यासाठी अपुर्या पडत होत्या, यामुळे येथील नागरिकांनी पीएमपीला या भागातील गाड्या वाढविण्याची मागणी केली होती. यामुळे पीएमपी प्रशासनाने येथे नव्याने उभारलेला ई-डेपो पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या दोन दिवसांत येथील ई-डेपोतून अतिरिक्त बस सुटणार आहे. यामुळे नागरिकांची मोठी सोय होणार आहे.