लोणी काळभोर, (पुणे) : सच्चा पत्रकार आपल्या लेखणीतून सरकारच्या विविध योजना गोरगरीब लोकांपर्यंत पोहोचवणे, पीडितांना न्याय मिळवून देणे, गरिबांसाठी आवाज उठवणे, भ्रष्ट अधिकारी आणि नेत्यांना चाप लावण्याचे काम करीत असतात. अशा समाजासाठी आणि लोकशाहीसाठी जगणाऱ्या वागणा-या पत्रकारांच्या सर्वांगीण विकासासाठी “प्रिंट व डिजीटल मिडीया पत्रकार संघ” हि नवीन पत्रकार संघटना सदैव प्रयत्न करणार आहे अशी माहिती प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र उर्फ बाप्पूसाहेब काळभोर यांनी दिली.
कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील हॉटेल एस फोर जी येथे रविवारी ( दि. १८) हवेली तालुका पत्रकार संघाची बैठक जेष्ठ पत्रकार राजेंद्र काळभोर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी “प्रिंट व डिजीटल मिडीया पत्रकार संघ” (PDMPS) असे नाव असलेली नवीन पत्रकार संघटना स्थापन करण्यात आली. या नव्या संघटनेची ध्येय, धोरणे, भविष्यातील वाटचाल या विषयावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी काळभोर बोलत होते.
यावेळी प्रिंट व डिजीटल मीडिया पत्रकार संघाचे राज्याचे वरिष्ठ पत्रकार सुनील जगताप, सल्लागार तुळशीराम घुसाळकर, प्रभाकर क्षीरसागर, जनार्दन दांडगे, संदीप बोडके, जयदीप जाधव, विजय काळभोर, सचिन माथेफोड, सचिन सुंबे, अमोल अडागळे, चंद्रकांत दुंडे, सुधीर कांबळे, विशाल कदम, हनुमंत चिकणे, सुनील तुपे, प्रशांत बोऱ्हाडे, रियाज शेख आदी उपस्थित होते.
यापुढे बोलताना बाप्पूसाहेब काळभोर पुढे म्हणाले,”पत्रकारांना काम करताना भरपूर अडचणी येतात. या अडचणी सोडवून पत्रकारांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी हि संघटना काम करणार आहे. एकटा माणूस काम करण्यास मर्यादा येतात, त्यामुळे संघटीत राहुन एकत्रितपणे काम करण्यास या संघटनेमध्ये भर देण्यात आहे.”
यावेळी बोलताना समन्वयक सुनील जगताप म्हणाले, “प्रिंट व डिजीटल मिडीया पत्रकार संघ असे नाव नवीन संघटनेला दिले आहे. हे नवे नाव, नावाची नोंदणी, नव्या संघाचा माध्यमातून पत्रकारांच्या हितासाठी “प्रिंट व डिजीटल मिडीया पत्रकार संघ” पत्रकारांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी कायम त्यांच्या पाठीशी असणार आहे. ”
दरम्यान, पुढील महिन्यात नवीन पत्रकार संघटनेच्या औपचारिक उदघाटन समारंभ आयोजित करण्याचे सर्वानुमते ठरवण्यात आले. उपस्थित सदस्यांनी आपापले मनोगत व्यक्त केले. उपस्थितांचे आभार अमोल अडागळे यांनी मानले.