पुणे : पुण्यातील एका बॉसने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी स्विगीवरून तब्बल ७१ हजारांचे जेवण ऑर्डर केली आहे. वर्षाखेर अन्न डिलिव्हरी करणारी कंपनी “स्विगी”ने त्यांचा वार्षिक अहवाल जाहीर केला आहे. या अहवालात ही माहिती समोर आली आहे.
स्विगीच्या रिपोर्टमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, पुण्यातील एका बॉसने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एकाचवेळी तब्बल ७१००० रुपयांचे बर्गर आणि फ्राईज मागवले आहेत. दरम्यान ही माहिती समोर आल्यानंतर या बॉसची पुण्यात जोरदार चर्चा सुरु झाली आहे. बॉस असावा तर असा, असे पुणेकर म्हणत आहेत. पुण्यातील ही व्यक्ती सगळ्यात जास्त किंमतीची ऑर्डर देणारा स्विगीचा दुसरा ग्राहक ठरला आहे.
दरम्यान, स्विगीच्या अहवालातून आणखीन काही मुद्दे समोर आले आहेत, ते म्हणजे भारतात या वर्षी प्रती मिनिट १३७ बिर्याणी ऑर्डर केल्या गेल्याची माहिती अहवालातून समोर आली आहे.
तर , भारतात बिर्याणी नंतर मसाला डोसा, चिकन फ्राईड राइस, पनीर बटर मसाला, बटर नान, व्हेज फ्राईड राईस, व्हेज बिर्याणी आणि तंदुरी चिकन हे पदार्थ सर्वाधिक मागवले गेले आहेत. २७ लाख वेळा गुलाबजाम तर १६ लाख वेळा रसमलाई ऑर्डर केल्याची माहिती समोर आली आहे.