लहू चव्हाण
पाचगणी : पाचगणी (गोडवली ता. महाबळेश्वर) येथील ॲस्टाॅन हॉस्टेलच्या ‘ॲस्टाॅन डिफेन्स अकॅडमी ‘चा आर्मीच्या १५ मराठा बुर्ज बटालियनचे लेफ्टनंट मयंक नाईकनावरे यांच्या हस्ते शुभारंभ झाला.
यावेळी सुभेदार दिलिप डफळ, सुभेदार मेजर अंकुश चव्हाण, ‘अमर एज्युकेशनल ॲन्ड सोशल डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन’ पांचगणी ॲस्टाॅन हॉस्टेलचे चेअरमन अमर बिरामणे, व्हा. चेअरमन नरेंद्र बिरामणे, ट्रस्टी विजय बिरामणे, रंजना बिरामणे, सारिका बिरामणे, प्रज्ञा बिरामणे, शिक्षक अमोल कांबळे, अजय गायकवाड, अंजली कांबळे, संतोष जाधव, मोहम्मद अली बधणे, प्रकाश खरात आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले. प्रास्तविकत अमोल कांबळे आणि विद्यार्थी मयुरेश पाटील तर अमर बिरामणे आणि यांनी आभार मानले.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना लेफ्टनंट मयंक नाईकनावरे म्हणाले,विद्यार्थी हे भारताचे उद्याचे भविष्य आहे. या दृष्टीकोनातून विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवण्यासाठी शिक्षक व सैनिकी प्रशिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे. विद्यार्थ्यांनीही आपले भविष्य घडविण्यासाठी योग्य दिशा निवडणे गरजेचे असून विद्यार्थी दशेत आपले विचार हे बहुआयामी ठेवून राष्ट्राच्या जडणघडणीतही योगदान द्यावे.