पुणे : वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून बेपत्ता झालेला लोको पायलटला रेल्वे प्रशासनाने त्वरित शोध घ्यावा, अन्यथा पुण्यातून एकही रेल्वे चालू देणार नाही, असा इशारा नॅशनल रेल्वे मजदूर युनियनने रेल्वे प्रशासनाला दिला आहे. रेल्वे युनियनने सोमवारी (ता.५ ) सकाळी डीआरएम कार्यालयासमोर आंदोलन केले.
हरिशचंद्र अंकुश असे बेपता झालेल्या लोको पायलटचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लोको पायलट हरिशचंद्र यांनी ९ तासांची ड्युटी पूर्ण केल्यानंतर पुन्हा एक तास ओव्हरटाईम काम केले. त्यानंतर वरिष्ठांनी त्यांना अजून चार ते पाच तास ड्युटी करायला सांगितले. यावेळी लोको पायलट हरिशचंद्रने मला विश्रांतीची गरज असल्याचे वरिष्ठांना सागितले. त्यानंतर हरिशचंद्र अत्यंत खालच्या शब्दांमध्ये फोनवर सुनावण्यात आले. तसेच जर आमच्या ऐकले नाही तर बदली करू, अशी धमकीही देण्यात आली.
दरम्यान ड्युटी पूर्ण करून लोको पायलट घरी गेला असता, त्यांना दुसऱ्या दिवशी मिरजला बदली करण्यात आल्याचा मेसेज आला. यानंतर मी ऑफिसला जाऊन येतो असे पत्नीला सांगून घरातून बाहेर पडले. पायलट पुन्हा आजपर्यंत घरी आलेच नाही.
शनिवारपासून गायब असलेला लोको पायलट सोमवारपर्यंत नोकरीला आले नाही. तर घरी गेले नाही, त्यामुळे त्याच्या पत्नीसह रेल्वे युनियनने सोमवारी (ता.५ ) सकाळी डीआरएम कार्यालयासमोर आंदोलन केले. पुढील ४८ तासांमध्ये लोको पायलटला हुडकून आणा अन्यथा पुण्यावरून एकही रेल्वे चालू देणार नाही, असा इशारा रेल्वे प्रशासनाला दिला आहे.”