उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन परिसरातील महादेव मंदिर परिसरात राहणाऱ्या एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले आहे. अज्ञात व्यक्तीने कशाचे तरी आमिष दाखवून अपहरण केल्याची तक्रार तिच्या वडिलांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सदरची मुलगी हि उरुळी कांचन परिसरात कुटुंबीयांसोबत राहते. सोमवारी (ता. 26) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरातून बाहेर गेली होती. परंतु दुपारनंतरही ती मुलगी घरी परतली नाही. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी नातेवाईकांकडे चौकशी करण्यासह परिसरात तिचा शोध घेतला, परंतु ती आढळून आली नाही.
दरम्यान, मुलीच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञाताविरूद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. सदर मुलीविषयी काही माहिती असल्यास उरुळी कांचन पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन, उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी केले आहे.