पुणे : फर्ग्युसन टेकडीवर फिरायला गेलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्याला धमकावून त्याच्या गळ्यातील ३५ हजार रुपयांची सोनसाखळी चोरट्यांनी रविवारी (दि. २४) भर दुपारी लुबाडून नेली. फर्ग्युसन, हनुमान व बाणेर टेकडीवर गेल्या महिन्यांपासून लुटमारीचे सत्र सुरू असून, अद्याप चोरट्यांचा तपास लागलेला नाही.
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील एक विद्यार्थी रविवारी (दि. २४) दुपारी हनुमान टेकडीवर फिरायला गेला होता. तेथे दुपारी पावणेचारच्या सुमारास दोन चोरट्यांनी त्याला मारण्याची धमकी देऊन चोरट्यांनी त्याच्या गळ्यातील ३५ हजारांची सोनसाखळी लुबाडून नेली. त्यानंतर या तरुणाने डेक्कन पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदविली.