पुणे : खडकवासला विधानसभा निवडणुकीत बनावट मतदान, बाद मतदान, नोटा मतदान, टपाली मतदान, गृह मतदान, अनामत रक्कम जप्त, अशा अनेक आकडेवारी समोर येत आहेत. अनेक मतदार या वर्षी पहिल्यांदा मतदान करीत होते. मात्र, त्या मतदारांना मतदानासाठी गेल्यानंतर आपले नाव न सापडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तर, काहींना त्यांच्या नावावर बोगस मतदान झाल्याचे आढळले आहे. खडकवासल्यात तब्बल ७५ जणांनी बनावट (फेक) मतदान केले आहे, तर ५३ मतदारांचे मतदान बाद करण्यात आले आहे.