नवी दिल्ली : प्रसिद्ध कंपनी Ola कडून आपल्या उत्पादनांवर जास्त भर दिला जात आहे. त्यात ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल यांची आव्हाने संपताना दिसत नाहीत. पण आता ओला इलेक्ट्रिकला ग्राहकांच्या तक्रारी आणि नाराजीचा सामना करावा लागत आहे. दुसरीकडे, भाविश अग्रवाल यांनी Krutrim AI वर कोट्यवधींचा खर्च केला. मात्र, यातून कमाई मात्र शून्यच झाल्याचे दिसून आले.
कंपनीने Krutrim AI या आर्थिक वर्षात लाँच केले आहे. AI Venture ने या वर्षी ऑपरेशन्समधून कोणतेही उत्पन्न मिळवले नाही. कंपनीचे एकूण 2.84 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. कंपनीने R&D मध्ये सर्वाधिक गुंतवणूक केली आहे. Krutrim ने R&D मध्ये 134.86 कोटी रुपये खर्च केले आहेत. हा पैसा सिलिकॉन, कृत्रिम क्लाउड आणि अप्लायड एआयमध्ये खर्च करण्यात आला आहे. हे प्रॉडक्ट सध्या बीटा व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे.
कंपनी आर्थिक वर्ष 2025 च्या पहिल्या तिमाहीत ते लाँच करण्याच्या तयारीत आहे. जर आपण स्टँडअलोन आर्थिक विवरणाचा विचार केला तर, आर्थिक वर्ष 2024 मध्ये कंपनीने बँक ठेवींवर 3.05 कोटी रुपयांचे व्याज उत्पन्न मिळवले आहे. आर्टिफिशियलने डेटा सेंटरची क्षमता वाढवण्याची योजनाही तयार केली आहे. कंपनीने तिमाही विस्ताराद्वारे 2028 पर्यंत 1 GW पर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य ठेवले आहे.