मुंबई : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचा मोठा विजय झाला आहे. तर महाविकास आघाडीची अक्षरश: धुळधाण झाली आहे. महायुतीच्या या विजयानंतर आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी महायुती सरकारकडे मंत्रिपदाची मागणी केली आहे. हाके म्हणाले, सुरेश धस यासारख्या सातवी पास माणसाला जर मंत्रिपद देणार असाल, तर माझी लायकी आणि ज्ञान पाहून मला मंत्रिपद द्या. मला राज्यात गृहखातं, अर्थखातं द्या, नाहीतर केंद्रात मंत्रिपद द्या. राज्यात ओबीसी असलेल्या अर्ध्या लोकांचं मी नेतृत्व करतो, त्याचे प्रश्न सोडवण्यासाठी मला जे माध्यम मिळेल ते घेईन, असं सूचक वक्तव्य लक्ष्मण हाके यांनी केलं आहे.
काय म्हणाले लक्ष्मण हाके?
विधानसपरिषद नको, माझी लायकी त्याहून मोठी आहे. मला राज्यात गृहमंत्री, अर्थमंत्री किंवा शिक्षणमंत्री करा. त्या सातवी-आठवी पास असलेल्या सुरेश धसला जर तुम्ही मंत्री करणार असाल तर त्यापेक्षा मला करा. माझी लायकी जास्त आहे, ज्ञान जास्त आहे. ओबीसी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी जे काही करावं लागेल ते मी करणार, असं लक्ष्मण हाके म्हणाले.
ओबीसींनी त्यांचा प्रभाव दाखवला आहे. निवडणुकीच्या निकालाच्या आगोदरच सांगितलं होता की दुप्पट हरियाणा पॅटर्न असेल. माझ्यामुळे अनेक उमेदवार आले आणि अनेकजण पडले. जरांगे, टोपे, शरद पवार हे हवेत होते, त्यांचा करेक्ट कार्यक्रम केला. राजेश टोपे यांची 25 वर्षांची सत्ता ही 2500 मतांनी घालवली.
खुळचट बावळट जरांगे काहीही बोलत आहे : लक्ष्मण हाके
मनोज जरांगे पाटील यांना लोक कंटाळले असून त्यांनी १३० जागा पाडायची भाषणे केली, जिथे मेसेज दिला तिथे लोक मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. जरांगे खोटे बोलत आहेत. मी जिथे सभा घेतल्या तिकडे चांगली उमेदवारांना मते पडली आहेत. आता मनोज जरांगेंवर ही शेवटची पत्रकार परिषद घेत आहे, असा टोला लक्ष्मण हाके यांनी यावेळी लगावला.
पुढे म्हणाले, खुळचट बावळट जरांगे काहीही बोलत आहेत. आम्ही राजेश टोपेला पाडले, लबाड माणूस आहे. निवडणूक निकाल ही जरांगे यांना चपराक आहे, आम्ही ओबीसीला जवळ म्हणणारी माणसे आहेत. मी जाहीर भूमिका घेतली होती महायुतीची सुपारी. बाप्पा सोनवणे निवडून आले तेव्हा ते म्हणत होते मी जरांगेमुळे निवडून आलो, असंही लक्ष्मण हाके म्हणाले.