उरुळी कांचन, (पुणे) : सकाळच्या प्रहारी नैसर्गिक विधी आटोपण्यासाठी काटवाणात गेलेल्या 50 वर्षीय व्यक्तीवर डूकरांनी केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील सायरस पूनावाला शाळेजवळील परिसरात सकाळी सात वाजण्याच्या सुमारास हि घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
बापु सिताराम खामगळ (वय- 45, रा. आश्रम रोड उरुळी कांचन ता. हवेली) असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सदर ठिकाणी उरुळी कांचन पोलिसांनी भेट दिली असून पुढील कार्यवाही सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बापू खामगळ हा मिळेल ते काम करीत होता. सकाळच्या पहारी नैसर्गिक विधी आटोपण्यासाठी काटवाणात गेला होता. सायरस पुनावाला शाळेजवळ पीरसाहेब दर्गा जवळ एका इसम पडलेला दिसला. त्यांनी तात्काळ उरुळी कांचन पोलिसांना माहिती दिली.
घटनास्थळी पोलीस दाखल झाले व त्यांनी पाहणी केली असता यावेळी बापु खामगळ याची अवघड जागा व पाठीमागील जागा हि डूकरांनी खाल्ली असल्याचे दिसून आले. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्याचा जागेवरच मयत झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सदर घटनेचा पोलिसांनी पंचनामा केला असून पुढील कार्यवाही सुरु आहे.