पुणे : हवेतील गारठा वाढला असून राज्यात हुडहुडी भरली आहे. उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडी वाढत असून, तिथून वाहणाऱ्या शीतलहरींनी महाराष्ट्रात तापमानात घट आणल्याचं बघायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात थंडी वाढली आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही थंडीची चाहून लागली आहे.
नाशिक जिह्यातील निफाड तालुक्यात आणि धुळे जिल्यात निच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. या ठिकाणी तापमान 10.5 अंशांवर पोहोचलं आहे. राज्यात पुढचे पाच दिवस किमान आणि कमाल तापमानात मोठी घट होणार आहे. जवळपास राज्यातील 17 जिल्ह्यांमध्ये तापमान 15 अंशांवर असून पुढील 48 तासांमध्ये ही घट कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापुरात थंडी वाढणार असल्याचा अंदाज आहे.